You are currently viewing देवगड तालुका खरेदी विक्री संघ निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी पॅनेलचा एकतर्फी विजय

देवगड तालुका खरेदी विक्री संघ निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी पॅनेलचा एकतर्फी विजय

१५ पैकी १५ जागांवर विजय केला संपादित : शिवसेना-काँग्रेस आघाडीला एकही जागा नाही

देवगड

देवगड तालुका खरेदी विक्री संघ पंचवार्षिक निवडणुकीत आम.नितेश राणे माजी आमदार अजित गोगटे राष्ट्रवादी नेते नंदकुमार घाटे यांच्या नेतृवाखालील भाजप राष्ट्रवादी पॅनेलने १५ पैकी १५ जागांवर विजय संपादित केला १५ जागा जिंकून भाजप राष्ट्रवादी आघाडीने एकतर्फी विजय खेचून आणला तर शिवसेना काँग्रेस आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही.

देवगड तालुक्यातील प्रतिष्ठेचा तालुका खरेदी विक्री संघ भाजपने आपल्याकडे राखून ठेवला असून यानंतर कार्यकर्ते नवनिर्वाचित संचालक भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांनी विजयी जल्लोष केला.

देवगड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये १५जागांसाठी २६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते .मंगळवार सकाळी पासून मतदानाकरिता मतदारांनी गर्दी केली होती या निवडणुकीत भाजप राष्ट्रवादी आघाडी,विरुद्ध शिवसेना काँग्रेस आघाडी अशी लढत होत असून पहिल्या पासून भाजपच्या अधिपत्याखाली असलेल्या या खविसंघाची २० वर्षानंतर निवडणूक होत असून यात एकूण सभासद २७३२ पैकी ७७७ सभासदांनी मतदानाचा हक्क बजाविला एकूण २७ % मतदान झाले.तर संस्था सदस्या मधून ३८ पैकी ३७ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजाविलाएकूण ८१४ सदस्यांनी हक्क बजाविला


भाजप माजी आमदार अजित गोगटे,जिल्हा बँक संचालक प्रकाश बोडस,जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे,जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप साटम,अन्य पदाधिकारी राष्ट्रवादी नेते नंदकुमार घाटे तसेच शिवसेना तालुका प्रमुख मिलिंद साटम, उपतालुका प्रमुख रवींद्र जोगल,महिला संघटक हर्षा ठाकूर,जिल्हा बँक माजी संचालक संभाजी साटम राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष उमेश कुळकर्णी, माजी अध्यक्ष उल्हास मणचेकर,जिल्हा सदस्य सुरेश देवगडकर महिला प्रदेश प्रतिनिधी सुगंधा साटम,या ठिकाणी उपस्थित होते.

अनुसुचित जाती,जमातीच्या जागेसाठी शैलेंद्र नाना जाधव ( ६५६ ) विजयी विरुध्द दिलीप तानाजी कदम( १२६ ) पराभूत यांच्यामध्ये लढत झाली.
. तर इत्तर मागास प्रवर्गाच्या १जागेसाठी माजी सभापती रविंद्र जोगल (१३२ )विरुध्द भाजपाचे तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर(६४३) विजयी यांच्यामध्ये लढत झाली तर ३९ मते बाद झाली.. भटक्या विमुती जाती जमाती व विशेष मागास प्रवर्ग या मतदार संघांतील एका जागेसाठी धोंडू धाकू कोकरे ( ६३९) विजयी विरुध्द उल्हास मणचेकर(१४८)पराभूत यांच्यामध्ये लढत झाली. महिला राखीव मतदार संघातील २ जागांसाठी ४उमेदवार उभे होते. संपदा बोंडाळे( ६३१) विजयी व रेश्मा जोशी( ५९०) विजयी विरुध्द अनुजा चव्हण ( १०५) व हर्षा ठाकुर ( १३६) पराभूत यांच्यामध्ये लढत झाली. तर व्यक्तीगत सदस्य मतदार संघांमधून ६ जागांसाठी १०उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये अब्दुल अल्ली खान ,( ५२) पराभूत रामदास अनंत अनभवणे( ६२७ ),विजयी मंगेश धोपटे, ( १११) पराभूत श्रीराम घाडी,( १०३)पराभूत माजी आमदार अजित गोगटे( ६११) विजयी,उदय करंगुटकर,( ९९)पराभूत माधव कुलकर्णी,(६०८)विजयी मनोज पारकर,(१०३) पराभूत संतोष कुमार फाटक,( ६०९)विजयी प्रविण राणे,( ५९४)विजयी राजेंद्र शेटये ( ६०९)विजयी तर संस्था सदस्य मतदार संघामधील ४ जागासांठी ५ उमेदवार रिंगणात आहेत. यात ३८ पैकी ३७ उमेदवारांनी हक्क बजाविला यात तीन मते बाद झाली .यामध्ये सुभाष नार्वेकर( २९) विजयी चंद्रकांत पाळेकर,(२६)विजयी अजित राणे,( ३० ) विजयी संभाजी साटम( ७ )पराभूत रविंद्र तिर्लोटकर (२९)विजयी यांच्यामध्ये लढत झाली यात भाजप राष्ट्रवादी आघाडीचे चारही उमेदवार विजयी ठरले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनिल राहिंज सहा. निर्णय अधिकारी प्रेमानंद जाधव,जिल्हा उपनिबंधक कार्यालय अधिक्षक उर्मिला यादव सहकार अधिकारी अजय हिर्लेकर श्रीकृष्ण मयेकर यांनी काम पाहिले.
या निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद डगरे,विठ्ठल जोशी,रमाकांत पुजारे ,पोलीस हवालदार प्रवीण सावंत, महिला पोलीस नाईक प्राची धोपटे,महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियांका देवगडकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + 14 =