You are currently viewing मिलाग्रीस प्रायमरीच्या निवृत्त शिक्षिका क्लावडीया परेरा यांचे निधन

मिलाग्रीस प्रायमरीच्या निवृत्त शिक्षिका क्लावडीया परेरा यांचे निधन

सावंतवाडी

सावंतवाडीतील मिलाग्रीस इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या निवृत्त शिक्षिका क्लावडीया वेलांटीन परेरा (४५, रा. सालईवाडा, सावंतवाडी) यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. अलिकडेच प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यानंतर गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

क्लावडीया परेरा यांनी १४ वर्षे मिलाग्रीस प्री प्रायमरी स्कूलमध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले होते. विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून त्या परिचित होत्या. त्यामुळे त्यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर अनेक विद्यार्थी व पालकांकडून शोक व्यक्त करण्यात आला. त्यांच्या पश्चात पती आणि दोन मुलगे असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × one =