You are currently viewing चौके पंचक्रौशी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयंवत पाताडे यांचे निधन

चौके पंचक्रौशी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयंवत पाताडे यांचे निधन

संस्था स्थापनेपासून कार्यरत-संस्थेसाठी मोलाचे योगदान

मालवण

चौके पंचक्रौशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष जयवंत बाळकृष्ण पाताडे (८५) यांचे अल्पशा आजाराने पनवेल येथे शनिवारी निधन झाले. चौके पंचक्रौशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई या संस्थेमध्ये स्थापनेपासून आपली नोकरी संभाळून गेली ५८ वर्षे कार्यरत होते. मागील १० वर्षे ते संस्थेच्या अध्यक्षपदाची यशस्वी धुरा संभाळत होते.संस्थेला आर्थिक मदत मिळवून देण्यास पाताडे यांचा सिंहाचा वाटा होता.

त्यांच्या आकस्मित निधनाने संस्थेची फार मोठी हानी झालेली आहे.त्यांच्या कुटुंबावरा जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यातून सावरण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयाना देवो हि ईश्वर चरणी प्रार्थना! मुंबई तसेच स्थानिक संस्थेचे सर्व संचालक मंडळ,भ.ता.चव्हाण म.मा.विद्यालय या प्रशालेतील शिक्षण व शिक्षकेतर कर्मचारी,चौके पंचक्रोशी ग्रामस्थ त्यांच्या कुंटुबियांच्या दुःखात सहभागी आहेत.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × two =