You are currently viewing अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेकडून 54 वृक्ष रोपांचे वाटप

अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेकडून 54 वृक्ष रोपांचे वाटप

सावंतवाडी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 54 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनसेच्या शहर मध्यवर्ती कार्यालयात 54 वृक्ष वाटपाचा कार्यक्रम पार पडला. तसेच शाळा चालू झाल्याने मध्यवर्ती कार्यालयात विद्यार्थ्यांना वही व पेन चे वाटप करून वही पेन वाटपाच्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली उद्यापासून शहरातील विविध शाळांमध्ये जाऊन वह्या पेन वाटप करण्यात येणार असल्याचे यावेळी शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांनी सांगितले

मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांच्या ५४ वा वाढदिवस सर्वत्र विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात येत आहे या वाढदिवसानिमित्त येथील शहर मध्यवर्ती कार्यालय देखील विविध कार्यक्रम घेऊन वाढदिवस साजरा करण्यात आला श्री. ठाकरे यांच्या ५४ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ५४ वृक्ष वाटप करण्यात संकल्प ठेऊन शहर मध्यवर्ती कार्यालयात वृक्ष वाटप करण्यात आली त्याच प्रमाणे आता शाळा चालू झाल्याने शाळेचा विचार करून शालेय मुलांना वह्या आणि पेन वाटप उपक्रम राबविण्यात आला. ह्या उपक्रमाची सुरुवात शहर मध्यवर्ती कार्यालयात विद्यार्थ्यांना वह्या व पेन चे वाटप करून करण्यात आली तर उद्या पासून शहरातील विविध ठिकाणी असलेल्या शाळेमध्ये जाऊन वह्या व पेन वाटप करण्यात येणार असल्याची माहिती शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांनी दिली.

यावेळी बांदा शहराध्यक्ष बाळा बहिरे संतोष भैरवकर उपशहर अध्यक्ष शुभम सावंत डिंगणे ग्रा प सदस्य आदेश सावंत बांदा विभागीय अध्यक्ष नाना सावंत लॉटरी सेना तालुका अध्यक्ष राजेश मामलेकर इन्सुली शाखाध्यक्ष सुरेंद्र कोठावळे धाकोरे शाखा अध्यक्ष निलेश मुळीक बाबू राउळ, मनोज कांबळी आदी पदाधिकारी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + eight =