You are currently viewing वनविभागाकडून गव्याला जीवदान

वनविभागाकडून गव्याला जीवदान

*वन अधिकारी संदीप कुंभार यांच्या बचाव पथकाला यश*

मालवण :

 

मालवण तालुक्यातील गौंजेचीवरी येथे श्री. प्रकाश मेस्त्री यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या वन्यप्राणी गवा ची वन विभागाकडून यशस्वी सुटका करण्यात आली.

बुधवारी पहाटे सावंतवाडी वन विभागाला गौंजेचीवाडी येथे विहिरीमध्ये वन्यप्राणी गवा पडला अशी माहिती मिळाली. कुडाळ वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप कुंभार, सावंतवाडी वनपरिक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर आणि कडावळ वनपरिक्षेत्र अधिकारी अमित कटके यांचे नेतृत्वाखाली जलद बचाव पथक वन्यप्राणी गवा सुटकेसाठी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जागेवर पाहणी केली असता सदर वन्यप्राणी गवा पूर्णवाढ झालेला अंदाचे 15-16 वर्षे वयाचा नर गवा असल्याचे निदर्शनास आले. सदर गवा विहिरीवर वाढलेल्या वेली चा अंदाज न आल्यामुळे विहिरीत पडला असावा असे अंदाजावरून दिसून आले. गवा विहिरीत चिखलात रुतून राहिला होता. सदर वन्यप्राणी गवा सुखरूपरीत्या बाहेर काढण्यासाठी वन विभागाच्या टीमने जेसीबीच्या सहाय्याने रॅम्प तयार करून व्ह्यान मधे जाण्याकरता मार्ग मोकळा करून दिला. कोल्हापूर वनवृत्त चे रॅपिड टीमचे प्रदीप सुतार व त्यांचे सहकारी यांच्या मदतीने सहयाद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर येथील विशेष तयार करण्यात आलेल्या रेस्क्यू व्हान मध्ये घेऊन यशस्वीरित्या त्याची नैसर्गिक अधिवासात सुटका करण्यात आली.

वन्यप्राणी गवा हा आपल्या जैवविविधतेतील एक मोठा तृणभक्षी प्राणी असून तो आपल्या जीवसृष्टी तील एक महत्वाचा घटक आहे, म्हणुन या आपल्या कोकणातील ठेव्याचे जतन, संरक्षण व संवर्धन करण्यासाठी आपल्या सर्व सिधुदुर्गवासीयांनी असेच मोलाचे सहकार्य करावे असे आवाहन सावंतवाडी वन विभागामार्फत करण्यात येत आहे.

ही बचाव मोहिम उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री.एस नवकिशोर रेड्डी व सहायक वनसंरक्षक श्री. सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल संदिप कुंभार, वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, वनक्षेत्रपाल अमित कटके, मालवण वन परिमंडळचे वनपाल श्रीकृष्ण परीट, वनपाल सावळा कांबळे, वनपाल महेश पाटील, वनरक्षक अमोल पटेकर, अनिकेत माने, महेंद्र देशमुख, दिनेश मेश्राम, सरदार मनेर, वैदकीय अधिकारी श्री. वेरलेकर, वनसेवक परब, इब्रह्मापुरकर तसेच गौंजवाडी गावचे सर्व पदाधिकारी व स्थानिक ग्रामस्थ बांधव यांचे मोलाचे सहकार्याने पार पाडण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा