You are currently viewing “त्या” कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना देणार आधार : नगराध्यक्ष संजू परब

“त्या” कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना देणार आधार : नगराध्यक्ष संजू परब

पालिकेतर्फे वाहिली श्रद्धांजली

सावंतवाडी

सावंतवाडी नगरपालिकेचे कर्मचारी संजय वारंग व कंत्राटी कामगार कमलेश परब यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असून त्यांच्यावर आलेला प्रसंग फारच वाईट आहे. त्यामूळे या कोरोना योद्ध्यांच्या कुटुंबीयांना पालिकेतर्फे आधार देण्यात येणार असून वारंग यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस अनुकंपाखाली नियुक्तीचा लाभ देण्यासाठी तर कंत्राटी कामगार कमलेश परब यांच्या पत्नीस नगरपरिषदेच्या सेवेत कंत्राटी कामगार म्हणून नेमणूक देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करेन, अशी ग्वाही नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली.

सावंतवाडी पालिकेतर्फे दोन्ही कर्मचाऱ्यांच्या प्रति श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सद्भावना व्यक्त करताना नगराध्यक्ष संजू परब यांनी नगरपालिका तसेच महानगरपालिका यामधील कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून समावेश करून त्यांना विमा संरक्षण लाभ मिळवून देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. तसेच शहरातील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र सुरू करणे गरजेचे असून, याचा विचार शासन स्तरावर होणे गरजेचे असून त्यासाठी आवश्यक ती जागा नगरपालिका उपलब्ध करून देईल असे स्पष्ट केले.

यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर, सहाय्यक कार्यालय निरीक्षक आसावरी शिरोडकर, देविदास आडारकर, दीपक म्हापसेकर, अभियंता भाऊ भिसे, शिवप्रसाद कुडपकर, विनोद सावंत, परवीन शेख व अन्य कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − 10 =