You are currently viewing सिंधुदुर्ग मधील माकडांची होणार प्रगणना…

सिंधुदुर्ग मधील माकडांची होणार प्रगणना…

सिंधुदुर्ग मधील माकडांची होणार प्रगणना…

सावंतवाडी वन विभागाकडून माकड उपाययोजनेचे पुढचे पाऊल…

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हात जाणवत असलेल्या माकड व वानर या प्राण्यांच्या उपद्रवावर उपाययोजना करण्यासाठी सावंतवाडी वन विभागाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या माकड व वानर यांची शास्रोक्त पद्धतीने प्रगणना करण्यात येणार आहे.

यासाठी सावंतवाडी वन विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी, सामाजिक वनीकरण, कृषीखाते व स्वयंसेवक यांची एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे. या अंतर्गत जवळजवळ 300 जणांना सदरचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
यासंबंधी सविस्तर वृतांत असा की, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील माकड व वनर यांच्या उपद्रवामुळे फाळबागायती व शेतपिकांच्या होणाऱ्या नुकसानीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून माकड व वानर निर्मिती निर्बीजीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने मा. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची निर्मिती कारण्यात आलेली आहे. या अंतर्गत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हात माकड व वानर यांची शास्रोक्त प्रगणना करणे व त्यांच्या संख्येत झालेली वाढ नोंदविणेकामी सावंतवाडी वन विभागातील वन अधिकारी व कर्मचारी, सामाजिक वनीकरण, कृषीखाते व स्वयंसेवक असे जवळजवळ 300 जणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी प्रशिक्षक म्हणून तामिळनाडू मधील कोईम्बतूर येथील SACON इन्स्टिटयूट चे प्रमुख शास्त्रज्ञ श्री.डॉ. एच.एन. कुमारा हे लाभलेले आहेत. या एकदिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन उद्या दि.24 मे रोजी सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेले आहे. या प्रशिक्षणा नंतर 25 मे पासून सदरची प्रगणना प्रत्यक्षात जिल्हाभर पार पाडण्यात येणार आहे.
आजवर सावंतवाडी वन विभागाने जिल्ह्यात उपद्रवी ठरलेल्या माकड/वानर यांना पकडण्यासाठी एक रॅपिड रिस्पॉन्स टीम तयार केली आहे. याच टीमने वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी येथे आरसे फोडून त्रास देत असलेल्या माकडाला यशस्वीरित्या बंदिस्त केले होते, तरी सिंधुदुर्ग जिल्हात माकड व वानर यांच्यामुळे होणाऱ्या फाळबाग व शेतपीक नुकसानीवर प्रतिबंध आणण्याच्या आजवर राबविण्यात आलेल्या उपाययोजने मधील वन विभागाचे हे पुढचे ठोस पाऊल ठरणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा