You are currently viewing बार कौन्सिलच्या वतीने लोणावळा येथे निवासी अभ्यास शिबिराचा प्रारंभ

बार कौन्सिलच्या वतीने लोणावळा येथे निवासी अभ्यास शिबिराचा प्रारंभ

*बार कौन्सिलच्या वतीने लोणावळा येथे निवासी अभ्यास शिबिराचा प्रारंभ*

पिंपरी

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्या वतीने लोणावळा येथील
सिंहगड इन्स्टिट्यूट येथे गुरुवार, दिनांक २३ मे २०२४ रोजी नवोदित वकिलांसाठी चार दिवसीय निवासी अभ्यास शिबिराचा प्रारंभ करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी पुणे जिल्हा सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. राजेंद्र उमाप यांची प्रमुख उपस्थिती होती. पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले, सचिव ॲड. धनंजय कोकणे, माजी सचिव ॲड. निखिल बोडके, ॲड. मंगेश खराबे यांच्या वतीने न्यायमूर्ती माधव जामदार, प्रमुख जिल्हा न्यायाधीश महाजन, कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र उमाप यांचा सत्कार करण्यात आला.

दिनांक २३ मे ते २६ मे २०२४ या कालावधीत संपन्न होणार्‍या या निवासी अभ्यास शिबिरासाठी महाराष्ट्रभरातून अनेक नवोदित वकील बंधू भगिनी यांनी सहभाग नोंदविला आहे. या शिबिरात १ जुलै २०२४ पासून नव्याने लागू होणारे तीन कायदे त्यामध्ये भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा, भारतीय साक्ष अधिनियम या कायद्यांबाबत प्रमुख वक्त्याच्या वतीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या शिबिराचे आयोजन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे विद्यमान अध्यक्ष ॲड. राजेंद्र उमाप, उपाध्यक्ष ॲड. उदय वारुंजीकर, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य ॲड. आशिष देशमुख, ॲड. संग्राम देसाई, ॲड. जयंत जायभावे यांच्यावतीने करण्यात आले आहे. या शिबिरात बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे जवळपास सर्वच सदस्यांनी उपस्थिती दर्शवली. ॲड. पारिजात पांडे, ॲड. हर्षद निंबाळकर, ॲड. सुभाष घाडगे, ॲड. विवेकानंद घाडगे, ॲड. मोतिसिंह मोहटा, ॲड. वसंत साळुंके, ॲड. सतीश देशमुख, ॲड. असिफ कुरेशी आणि इतर सदस्य उपस्थित होते.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा