You are currently viewing डॉ. सुशिल सातपुते बंधुता काव्यप्रतिभा पुरस्कारने सन्मानीत

डॉ. सुशिल सातपुते बंधुता काव्यप्रतिभा पुरस्कारने सन्मानीत

पुणे येथील तेरावे धर्ममैत्री विचारवेध संमेलनात पुरस्कार प्रदान..

 

पुणे (वाघोली) – राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणे आणि भारतीय जैन संघटनेचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय वाघोली पुणे या संस्थाच्या संयुक्त विद्यमाने तेरावे धर्ममैत्री विचारवेध संमेलन १३ एप्रिल रोजी पार पाडले.

दुसरे सत्रा मध्ये प्रबोधनयात्री काव्य संमेलन आणि मा.मधुराणी बनसोड लिखित सन्मार्ग प्रकाशन सोहळा पार पडला.

यामध्ये बंधुता काव्यप्रतिभा पुरस्कार प्रदान करण्यात आले. लातुरचे सुपुत्र नवोदित कवि लेखक डॉ सुशिल सातपुते यांना मान्यवरांच्या हस्ते बंधुता काव्यप्रतिभा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच त्यांनी सादर केलेल्या “रक्तदान पटत नाही” या कवितेला मान्यवरांनी तसेच रसिकांनी भरभरून दाद दिली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सांगली येथील ज्येष्ठ गझलकार मा.सिराज शिकलगार तर प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ साहित्यिक मा.चंद्रकांत दादा वानखेडे, मा.माधुरी ओव्हाळ, मा. गुलाबराजा फुलमाळी (कवि तसेच संपादक, महाराष्ट्र साहित्य दर्पण), यांची होती.

डॉ. बंडोपंत कांबळे हे स्वागताध्यक्ष होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन ज्येष्ठ कवयीत्री संगीता झिंजुरके यांनी केले. पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे डॉ. सुशिल सातपुते यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

डॉ. सुशिल सातपुते सध्या छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती शाहु महाराज शिक्षण संस्था अंर्तगत कृषि महाविद्यालय कांचनवाडी येथे सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत.

या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक मा. प्रशांत रोकडे (अध्यक्ष, बंधुता प्रतिष्ठान), डॉ सहदेव चव्हाण (विभाग प्रमुख, मराठी विभाग) होते. हे संमेलन भारतीय जैन संघटनेचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय वाघोली, पुणे येथे पार पडले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 − seven =