You are currently viewing पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीस पोलिस कोठडी

पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीस पोलिस कोठडी

मालवण

गोळवण येथील सौ. जयश्री बाळकृष्ण खरात या सत्तावीस वर्षीय विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा पती बाळकृष्ण बमु खरात याला मालवण पोलीसानी अटक करून त्याला आज मालवण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १८ ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे गोळवण येथील जयश्री बाळकृष्ण खरात या विवाहितेचा मृतदेह मंगळवारी दुपारी राहत्या घरात गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आला होता. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती.

दरम्यान जयश्री हिच्या मोबाईलच्या कव्हरमध्ये एक चिठ्ठी पोलिसांना तपासादरम्यान सापडून आली. यात मुलबाळ होत नसल्याने आपला पती शारीरिक व मानसिक छळ करतो त्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचा मजकूर नमूद असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलीसांचा तपास सुरू होता. काल मयत जयश्री हिची बहीण सौ. संतोषी संतोष वरक रा.कडावल कुडाळ यांनी मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. जयश्री हिचा पती बाळकृष्ण हा जयश्री हिचा मानसिक व शारीरिक छळ करत होता. मुलबाळ होत नसल्याने परत लग्न करण्यासाठी एका महिलेशी संबंध असल्याचेही बाळकृष्ण याने जयश्री हिला सांगितले होते.

जयश्री हिला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले. अशी तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यानुसार बाळकृष्ण खरात याच्या विरोधात मालवण पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बाळकृष्ण खरात याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल रात्री बाळकृष्ण याला पोलिसांनी अटक केली. त्याला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १८ ऑक्टोबर पर्यंत पोलिस कस्टडी सुनावली आहे . याप्रकरणी मालवण पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर हे अधिक तपास करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा