You are currently viewing जन आशिर्वाद यात्रा २७ पासून रत्नागिरीतून सुरू –  प्रमोद जठार

जन आशिर्वाद यात्रा २७ पासून रत्नागिरीतून सुरू –  प्रमोद जठार

कणकवली

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा पुन्हा येत्या शुक्रवारपासून २७ ऑगस्ट ला रत्नागिरीतून सुरू होईल आणि सिंधुदुर्ग येथे दोन दिवस राहील. सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत नारायण राणे रत्नागिरीत यात्रा करतील. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांचे आगमन होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन दिवस यात्रा करून सांगता होणार आहे. या दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे भव्य स्वागत होणार असल्याची माहिती यात्रा संयोजक आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली. ते रत्नागिरी येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा