You are currently viewing मडुरा येथे रोणापाल माजी सरपंच प्रकाश गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

मडुरा येथे रोणापाल माजी सरपंच प्रकाश गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

बांदा

श्री देवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष तथा रोणापाल माजी सरपंच प्रकाश गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त सावित्री शंकर मंगल कार्यालय रोणापाल मडुरा तिठा येथे आज मान्यवरांच्या उपस्थितीत दिपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर श्री देवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष तथा रोणापाल माजी सरपंच प्रकाश गावडे,पाडलोस उपसरपंच राजू शेटकर,बांदा प्राथमिक आरोग्य केद्रांचे डाँ. मयुरेश पटवर्धन, सिंधू रक्त मित्र संस्थेच्या सावंतवाडी उपाध्यक्ष मंगल कामत रोणापाल पोलीस पाटील निर्जरा परब,शेर्ले माजी सरपंच उदय धुरी, सामाजिक कार्यकर्ते उल्हास परब, मंगेश गावडे,देवस्थान मानकरी परशुराम गावडे, ग्रा.प. सद-य नंदकीशोर नेमण,रोणापाल माजी सरपंच उदय देऊलकर, यावेळी शिवसेना विभाग प्रमुख (शिंदे गट) राजन परब, सांस्कृतिक मंडळाचे खजिनदार बाबल तुयेकर ,सचिव विष्णू सावंत,मडुरा सोसायटी माजी चेअरमन अशोक कुबल,आदि उपस्थित होते. यानंतर प्रकाश गावडे यांचा वाढदिवस सर्वांच्या केक कापून उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर बोलताना प्रकाश गावडे म्हणाले की सिंधुदुर्ग जिल्हयात होत असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊनच या प्रकाश गावडे मित्रमंडळाने असा स्तुत्य उपक्रम राबवला आहे या मंडळाचे मी मनापासून आभार मानतो.

या शिबिरासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी रक्तदान उत्फुर्त सहभाग घेतला. यामध्ये महीला वनिता गावडे यांनी ही रक्तदान केले. यापूर्वी ही सांस्कृतिक मंडळातर्फे गावात अनेक विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. गावातील व जिल्ह्यातील रुग्णाला रक्ताची गरज भासल्यास भविष्यात मंडळातर्फे रक्त उपलब्ध होईल अन रुग्णाला योग्यवेळी रक्तपुरवठा करता येईल. या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे प्रकाश गावडे मित्रमंडळाकडूनआले.

सांस्कृतिक मंडळाचे खजिनदार बाबल तुयेकर,उदय गावडे, दिलीप नाईक, विष्णू सावंत , निलेश नाईक, सुशांत गावडे, डाँ विशाल नाईक जीवनधारा ब्लड सेंटर कोल्हापूर
रक्त विघटन, व अफेरेसिस सेंटर कोल्हापूर यांनी रक्त शिबिरासाठी सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × one =