You are currently viewing नवेगाव कॉम्प्लेक्स येथील कवयित्री सौ किरण चौधरी राज्यस्तरीय ज्ञानसिंधू स्वयंसिद्धा पुरस्काराने सन्मानित

नवेगाव कॉम्प्लेक्स येथील कवयित्री सौ किरण चौधरी राज्यस्तरीय ज्ञानसिंधू स्वयंसिद्धा पुरस्काराने सन्मानित

गडचिरोली (प्रतिनिधी) :

गडचिरोली येथील सुप्रसिद्ध कवयित्री सौ किरण चौधरी यांना नुकताच राज्यस्तरीय ज्ञानसिंधू स्वयंसिद्धा पुरस्कार प्राप्त झाला असून त्यांना संभाजीनगर येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

ज्ञानसिंधू प्रकाशन संस्था नाशिक द्वारा महाराष्ट्रातील कला सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात प्रसिद्ध असणाऱ्या महिलांना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. पहिल्यांदाच गडचिरोली जिल्ह्यातील कवयित्री किरण चौधरी यांना हा मानाचा राज्यस्तरीय ज्ञानसिंधू स्वयंसिद्धा पुरस्कार कार्यक्रमच्या अध्यक्षा मा डॉ प्रतिभाताई इंगोले, मा.सायली पालखेडकर, मा. उत्कर्षा रुपवते, मा. अंजली धानोरकर, मा. निशा बाहेकर, स्वेता पाटील, सुदर्शना पाटील, प्रा.अरबाज रहमान  मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

या पुरस्काराचे स्वरूप पुष्पगुच्छ,सन्मानचिन्ह, मानवस्त्र व पुस्तके देऊन करण्यात आले. किरण चौधरी यांचा त्रिवेणीचा संगम हा कवितासंग्रह प्रकाशित असून आजपर्यंत यांनी अनेक विषयावर लेखन केलेले आहेत.त्यांच्या या यशाबद्दल झाडीबोली साहित्य मंडळातील सर्व कवींनी त्यांचे भरभरून कौतुक केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा