You are currently viewing देवगड येथे स्विफ्ट कार व रिक्षात अपघात, एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू…

देवगड येथे स्विफ्ट कार व रिक्षात अपघात, एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू…

पोलिस उपनिरिक्षकासह तिघे जखमी; रिक्षा चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल…

देवगड

स्वीफ्ट कार आणि रिक्षा यांच्यात समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात रिक्षा चालकासह दोघे प्रवासी जखमी झाले. मात्र गंभीर जखमी झाल्यामुळे उपचारा दरम्यान रिक्षा चालकाचे निधन झाले. तर कार मधील पोलिस उपनिरिक्षक दशरथ चव्हाण यांना ही दुखापत झाली. हा अपघात आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास देवगड-नांदगाव मार्गावर जामसंडे-खाकशीतिठा येथे घडला.
या अपघातात रिक्षा चालक अभिजीत कृष्णा पुजारे (३५) यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर देवगड येथिल रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन आरोस येथे हलविण्यात आले होते. परंतू सायंकाळी उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. या अपघाताची देवगड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तर रिक्षा चालकाविरोधात हयगयीने वाहन चालविल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − one =