You are currently viewing जलक्रीडा व्यावसायिकांना मुदतवाढ मिळण्यासाठी निलेश राणे प्रयत्नशील

जलक्रीडा व्यावसायिकांना मुदतवाढ मिळण्यासाठी निलेश राणे प्रयत्नशील

मालवण

पावसाची कोणतीही स्थिती नसल्याने समुद्री वातावरण चांगले आहे. मात्र बंदर विभागाच्या जलपर्यटन बंद या (अनेक वर्षांच्या) आदेशामुळे जल पर्यटन ठप्प झाले आहे. पर्यटन व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून जलपर्यटन सुरू होणे आवश्यक आहे. तरी मालवण शहरात मोठ्या संख्येने दाखल झालेल्या पर्यटकांना किल्ले सिंधुदुर्ग दर्शन आणि जलपर्यटन करण्यासाठी आवश्यक असणारी मुदतवाढ देण्याबाबत शासन स्तरावर लक्ष वेधण्यासाठी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी पर्यटन व्यावसायिकांच्या वतीने मालवण भाजप कार्यालयातून माजी खासदार निलेश राणे यांचे शुक्रवारी दूरध्वनीवरून लक्ष वेधले.

दरम्यान, निलेश राणे यांनी जलपर्यटनाला मुदतवाढ मिळावी यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू केला आहे. बंदर विभाग वरिष्ठ अधिकारी तसेच पालकमंत्री यांच्याशी लेखी पत्र देत चर्चा केली. सकारात्मक निर्णय घेण्यात व्हावा. अशी भूमिका मांडली आहे. किल्ला होडी वाहतूक संघटना आणि पर्यटन व्यावसायिक यांच्या हिताच्या दृष्टीने निर्णयासाठी आपण प्रयत्नशील आहोत. असे निलेश राणे यांनी स्पष्ट केले.

हा निर्णय पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विचार करून अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. तसेच धोरणात्मक स्वरूपाचा आहे. मात्र जनतेला न्याय मिळाला पाहिजे यासाठी सातत्याने कार्यरत असणारे निलेश राणे याबाबतही शासन प्रशासन स्तरावर प्रयत्नशील आहेत.

जलक्रीडा व होडी वाहतूक बंद बाबत बंदर विभागाने अंमलबजावणी सुरू केल्याने किल्ला होडी सेवा संघटना तसेच पर्यटन व्यावसायिक यांनी शुक्रवारी मालवण भाजप कार्यालयात येवून भाजप पदाधिकारी यांची भेट घेतली. जलपर्यटनाला मुदतवाढ मिळावी यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी मागणी केली. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर, शहर प्रभारी विजय केनवडेकर, माजी नगरसेवक दिपक पाटकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पर्यटन व्यावसायिक तसेच किल्ला होडी वाहतूक व्यवसायिक मंगेश सावंत, दिलीप आचरेकर, प्रसाद सरकारे, मनोज आढाव, हेमंत आचरेकर, जॉनी फर्नांडिस, चंदू सरकारे, अंतोन डिसोजा, संतोष सकपाळ, जयश्री सकपाळ, दिपाली कालमेतर तसेच अन्य व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मेरीटाईम बोर्डाच्या नियमावलीनुसार पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर समुद्रात होणारी जलवाहतूक व जलक्रीडा यांना दरवर्षी २६ मे पासून ३१ ऑगस्ट पर्यत बंदी करण्यात येते. मात्र अद्याप पावसाळी वातावरण नसल्याने तसेच सुट्टी कालावधी असल्याने पर्यटकांचा ओघ जास्त आहे. मात्र जलक्रीडा व किल्ला वाहतूक बंद असल्याने पर्यटक माघारी फिरत असून पर्यटनावर परिणाम होत आहे. हवामानाचा अंदाज घेऊन यापूर्वी काहीवेळा मेरिटाईम बोर्ड व स्थानिक बंदर विभाग यांच्याकडून सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतुकीस मुदतवाढ देण्यात आली होती. त्याधर्तीवर मुदतवाढ मिळावी यासाठी सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेलफेअर असोसिशनने किल्ला प्रवासी वाहतुकीस ३१ मे पर्यंतची वाढ मिळावी अशी मागणी केली आहे.

माजी खासदार निलेश राणे यांनी संघटनेच्या मागणीनुसार मेरिटाईम बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला. यापूर्वी बंदर विभागकडून सन २०१६ मध्ये मुदत वाढ देण्यात आली होती. त्याधर्तीवर वातावरण व सुरक्षेचा आढावा, हवामान खात्याचा अंदाज घेऊन मुदतवाढ मिळावी अशी भूमिका मांडण्यात आली आहे.

पर्यटन व्यावसायिक व होडी वाहतूक या सर्वांच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय व्हावा यासाठी निलेश राणे शासन स्तरावर पाठपुरावा करत असल्याचे सुदेश आचरेकर, बाबा परब, विजय केनवडेकर, बाबा मोंडकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven − six =