You are currently viewing श्री देवी महालक्ष्मीचा वार्षिक जत्रोत्सव २४ ते २६ नोव्हेंबरदरम्यान

श्री देवी महालक्ष्मीचा वार्षिक जत्रोत्सव २४ ते २६ नोव्हेंबरदरम्यान

श्री देवी महालक्ष्मीचा वार्षिक जत्रोत्सव २४ ते २६ नोव्हेंबरदरम्यान

तीन दिवस धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल; पालखी सोहळा, कीर्तन व दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन

कुडाळ

श्री देवी महालक्ष्मीचा वार्षिक जत्रोत्सव २४ ते २६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत मोठ्या भक्तिभावाने साजरा होणार आहे. यानिमित्त तीन दिवस मंदिरात विविध धार्मिक विधी, अभिषेक, सालंकृत महापूजा, महाआरती, महाप्रसाद, पालखी सोहळा, कीर्तन आणि दशावतार नाट्यप्रयोगांचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी सामुदायिक प्रार्थना, लघुरुद्र, उपदेवता पूजा व देवीची सालंकृत महापूजा होणार आहे. रात्री ११ वाजता पालखी सोहळा, तर मध्यरात्री १२ वाजता वालावलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होईल.

बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी अभिषेक, महापूजा, महाआरती, गोपाळकाला, देवस्नान आणि उपदेवतांची भेट असे कार्यक्रम होतील. रात्री १० वाजता लळिताचे कीर्तन, अक्षतारूपी व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी अभिषेक, सालंकृत महापूजा, महानैवेद्य, महाआरती व महाप्रसाद होणार आहे. या दिवसाच्या महापूजेचे यजमानपद कोल्हापूर येथील प्रभाकर दत्तात्रय बिल्ले भूषविणार आहेत. सायंकाळी ४ वाजता सांगतेची प्रार्थना होऊन तीन दिवसीय जत्रोत्सवाची सांगता होणार आहे.

या जत्रोत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन देवीचे दर्शन व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा