You are currently viewing वेंगुर्ले तालुक्यात एकूण 23 पैकी 13 ग्रामपंचायतीवर भाजपचे सरपंच विजयी

वेंगुर्ले तालुक्यात एकूण 23 पैकी 13 ग्रामपंचायतीवर भाजपचे सरपंच विजयी

वेंगुर्ला :

 

वेंगुर्ला तालुक्यात जाहीर झालेल्या एकूण 23 ग्रामपंचायती पैकी 13 ग्रामपंचायतीवर भाजपने आपले वर्चस्व ठेवले आहे. तर शिंदे गट बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून पाच ग्रामपंचायतीवर दावा करण्यात आला असून उर्वरित ग्रामपंचायत महाविकास आघाडीकडे गेल्याचे चित्र दिसत आहे. परबवाडा, रेडी, परुळेबाजार, कुशेवाडा, तुळस आदि ठिकाणी भाजपाने आपली वर्चस्व राखले असून आसोली, पाल, अणसुर, पालकरवाडी, वेतोरे, आडेली, मठ, चीपी ग्रामपंचायतीवर आपल्या पक्षाचे सरपंच विराजमान झाल्याचे भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी सांगितले. तर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख नितीन मांजरेकर यांनी मेढा, होडावडा, भोगवे, कोचरा, म्हापण या ठिकाणी आपल्या पक्षाचे सरपंच विराजमान झाल्याचे सांगितले. तर उर्वरित शिरोडा, उभादांडा, दाभोली, केळूस ग्रामपंचायत या महाविकास आघाडीकडे गेल्या आहेत. वेंगुर्ला तहसील कार्यालयात दुपारी दोन वाजेपर्यंत निवडणूक निकालाची प्रक्रिया सुरू होती. तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळेस निकाल जाहीर होईल याकडे कटाक्षाने लक्ष दिले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस फाटा ही तयार ठेवण्यात आला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − eleven =