You are currently viewing श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे वाणिज्य विभागाचे प्रा. हर्षद राव सेवानिवृत्त

श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे वाणिज्य विभागाचे प्रा. हर्षद राव सेवानिवृत्त

सावंतवाडी

श्री पंचम खेमराज महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचे प्रा. हर्षद राव हे आपल्या नियत वयोमानानुसार महाविद्यालयातून निवृत्त झाले. त्यांनी महाविद्यालयामध्ये 15 वर्षे सेवा केली .त्यांच्या निवृत्ती निमित्त त्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले, कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले, संस्थेचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत, संस्थेचे संचालक प्रा. डी टी देसाई, सहसंचालक अॅड. शामराव सावंत, प्राचार्य डाॅ. डी.एल भारमल,सौ राव ,महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग ,शिक्षकेतर कर्मचारी, माजी प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी प्रा. हर्षद राव यांचा संस्थेचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल यांनी केले. त्यांनी प्राध्यापक हर्षद राव यांनी महाविद्यालयाच्या विविध उपक्रमामध्ये विशेषतः नॅक साठी फार मोठी मेहनत घेतली व ते विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत असे सांगीतले. प्रा. हर्षद राव यांच्या विषयी वाणिज्य विभागप्रमुख डॉ. एस.ए.देशमुख, प्रा.बी.एन.हिरामणी
प्रा. व्ही.जी बर्वे ,प्रा. टी.व्ही कांबळे, प्रा. सौ नीलम धुरी, डॉ. सौ प्रगती नाईक, डॉ. सौ सुनयना जाधव, माजी प्रा. डी. डी.गोडकर, डॉ. सुधीर बुवा, माजी प्रा. जी .एम शिरोडकर, प्रा. एम बी बर्गे, डॉ. डी जी बोर्डे यांनी आपले अनुभव व भावना व्यक्त केल्या.
संस्थेचे संचालक प्रा.डी.टी.देसाई यांनी सागीतले की प्रा. राव आल्यापासून वाणिज्य विभागाची घडी व्यवस्थित बसली व विभागाचा निकाल उत्तम लागायला लागला. प्रा.राव यांची एखादा विषय व्यवस्थित समजावुन सांगण्याची हातोटी यामुळेच ते विद्यार्थ्यांमध्ये प्रिय आहेत. संस्थेचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले
यांनी प्रा.राव यांच्या आजपर्यंतच्या कारकीर्दीचे कौतुक केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ.बी एन हिरामणी यांनी केले व आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 1 =