You are currently viewing राजापूर येथे झालेल्या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत श्री चेस अकॅडमी च्या मुलांचे विविध गटात प्राविण्य

राजापूर येथे झालेल्या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत श्री चेस अकॅडमी च्या मुलांचे विविध गटात प्राविण्य

कणकवली :

राजापूर येथे घेण्यात आलेल्या के वसंत आठल्ये स्मृती चषक खुली बुद्धिबळ स्पर्धेत गोवा, कोल्हापूर, चिपळूण, सिंधुदुर्ग येथील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता यात 20 मानांकित खेळाडू होते. या स्पर्धेत श्री चेस अकॅडमी कणकवलीच्या खेळाडूंनी भाग घेऊन आठ फेरी मध्ये खेळाचे उत्तम प्रदर्शन करीत विविध गटात प्राविण्य मिळवले. यामध्ये मिनल सुलेभावी, तनिष्का आडेलकर, वरद तवटे, पार्थ कुडतरकर, सात्विक मालंडकर, सन्मिल साटेलकर, गार्गी सावंत, दिक्षा जाधव, लावण्य मसुरकर, गौरेश तायशेटे या खेळाडूंनी विविध बक्षिसे मिळविली. या सर्वांना श्रीकृष्ण आडेलकर सर, राजेंद्र तवटे सर यांचे मार्गदर्शन लाभले या सर्व मुलांचे पालक वर्गातून अभिनंदन करणेत येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा