You are currently viewing भविष्यात दोडामार्ग तालुका पर्यटनाचे केंद्र बनेल: आ.केसरकर

भविष्यात दोडामार्ग तालुका पर्यटनाचे केंद्र बनेल: आ.केसरकर

दोडामार्ग

येत्या काळात दोडामार्ग तालुका पर्यटनाचे माहेरघर असेल , असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी केले . तिलारीत बिग पर्यटन प्रकल्प साकारण्यासाठी आपला प्रयत्न सुरू असल्याचा पुनरुच्चार पुन्हा एकदा आमदार केसरकर यांनी केलाय . तर सप्तधरा पर्यटन संस्थेने निवडलेल्या सात पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी आपले प्राधान्याने प्रयत्न राहणार असल्याची ग्वाही केसरकर यांनी कुंब्रल येथील पर्यटन महोत्सवात दिलीय . कुंब्रल येथील सप्तधरा पर्यटन महोत्सवाच्या बक्षीस वितरण समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते .

कुंब्रल येथील सप्तधरा पर्यटन संस्थेने आयोजित केलेल्या एक दिवशीय पर्यटन महोत्सवात घेण्यात आलेल्या खेळ पैठणी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले . या स्पर्धेत प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेल्या प्रणवी परब यांसह वैष्णवी नाईक , जोना आईर , शिल्पा सावंत , प्रज्ञा सावंत , त्यानंतर अन्य विजेत्या स्पर्धकांना पैठणी व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले . यावेळी माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर यांच्यासोबत व्यासपीठावर जिल्हा बँक संचालक गणपत देसाई , शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी , तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस , सप्तधराचे अध्यक्ष ल . वि . सावंत , सरपंच प्रवीण परब , माजी सभापती दयानंद धाऊसकर , मानकरी सावंत उपस्थित होते .

आमदार केसरकर यांनी यावेळी आपल्या पुढाकाराने बदलत्या दोडामार्गबाबत आढावा घेताना सांगितले की , १५ वर्षांपूर्वी दोडामार्ग आणि आजचा दोडामार्ग याचा आरोप करणाऱ्यांनी विचार करायला हवा . दोडामार्गसाठी पर्यटन दृष्टीने व विकासासाठी आवश्यक अशा तळकट कुंभवडे- चौकुळ , मोर्ले – पारगड , मांगेली – सडा कर्नाटक , – – उसप तळेखोल , मेढे – तेरवण असे शेकडो कोटींचे नवीन रस्ते दोडामार्ग हॉस्पिटल साठी २२ कोटी तर पंचायत समिती इमारत साठी १० कोटी निधी आपण उपलब्ध करून दिलाय . दोडामार्ग मधील सप्तधरा पर्यटन सहकारी संस्थेने पर्यटन जागरसाठी जो पुढाकार घेतला तो कौतुकास्पद आहे . सूत्रसंचालन रवींद्र देसाई यांनी केले .

सोलर हायमास्ट आणि व्यायामासाठी ५ लाखांचे साहित्य...

कुंब्रल शांतादुर्गा परिसरात ग्रामस्थांच्या मागणीनुसार आमदार दीपक केसरकर यांनी ३ लाखांचा सोलर हायमास्ट तर व्यायामशाळेसाठी ५ लाखांचं व्यायाम साहित्य आमदार निधीतून देत असल्याचे जाहीर केलं .

तर कुंब्रल येथे भक्त निवास …

येथील गावकरी मंडळींनी जागा उपलब्ध करून दिल्यास व कुंब्रल मंदिर क वर्ग पर्यटन स्थळ म्हणून विकास केल्यास या ठिकाणी क वर्ग पर्यटन मधून ५ ते १० खोल्यांचे भक्तनिवास आपण उभारणी करण्यासाठी पुढाकार घेऊ , भविष्यात हेच भक्तनिवास या भागात येणाऱ्या पर्यटकांना सुद्धा पर्यटन वाढीसाठी उपलब्ध करून देता येईल .

सरपंच प्रवीण परब यांचा विशेष सत्कार

जिल्हा स्मार्ट पुरस्कारासह विविध पुरस्कारांना गवसणी घालून नुकतेच दोडामार्ग तालुक्यातून दिल्लीत पंचायतराज परिषदेसाठी नेतृत्व करणाऱ्या कुंब्रल गावचे अभ्यासू सरपंच प्रवीण परब यांचा आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन विशेष सन्मान करण्यात आला .

प्रतिक्रिया व्यक्त करा