You are currently viewing लोक साहित्यीक श्री. सीताराम नरके यांचे “परतीच्या वाटेवर” पुस्तक प्रकाशित

लोक साहित्यीक श्री. सीताराम नरके यांचे “परतीच्या वाटेवर” पुस्तक प्रकाशित

*लोक साहित्यीक श्री. सीताराम नरके यांचे “परतीच्या वाटेवर” पुस्तक प्रकाशित*

वानवडी, पुणे-(प्रतिनिधी)

ज्ञानाई फाऊंडेशन, हेवन पार्क, महंमद वाडी येथे सभागृहात झाले.
राष्ट्रपती पोलीस पदक मानकरी कवी सीताराम नरके यांचा ६५ व्या वाढदिवसा निमित्त ,गीतगायन, खुले कवी संमेलन ,चारोळी संग्रह प्रकाशनआयोजित करण्यात आले होते.
प्रथम सत्रात सर्वेसर्वा मंडळाच्या संगीत विशारद सौ . अर्चना भट यांच्या गायनाने सभा गायनाला सुरवात झाली .उर्मिला, अस्मिता सोनवणे, गायत्री यांनी गीते सादर केली. बबन धुमाळ, बाबा ठाकूर, बाबू डिसोजा हे मंचावर उपस्थित होते.
द्वितीय सत्रात गझलकार बबनराव धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली खुल्या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, मसूद भाई पटेल आणि बाबा ठाकूर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कवी संमेलनात
जवळपास चाळीस कवींनी आपल्या रचना सादर केल्या .
तिसऱ्या सत्रात चारोळी संग्रहाचे प्रकाशन झाले.
“कवींनी लिहिण्याआधी वाचायला हवं. तुम्ही किती लिहिलं? या पेक्षा किती सकस लिहिलं हे अधिक महत्वाचं आहे. समाज घडविण्याची ताकद लेखनात आहे. परंतु त्यासाठी लेखनात समाजाचे प्रतिबिंब दिसायला हवे. वाचकांना रुचेल समजेल असे लिहायला हवे.” असे उदगार विजय शेंडगे यांनी काढले. व्यासपीठावर विजय शेंडगे यांच्यासह सुरेश पाटोळे, डॉ. मदन कोठुळे , युवराज दिसले, सूर्यकांत तिवडे आदि मान्यवर उपस्थित होते.


महाराष्ट्राचे रानकवी श्री जगदीप वनशिव आणि प्रेमकवी सुरेश धोत्रे यांनी कवी संमेलनाचे सुत्रसंचालन केले .
याप्रसंगी “सम्राट अशोक “या नाटकातील कलाकारांचा सन्मान ज्ञानाई फाऊंडेशन वतीने करण्यात आला.
मच्छिंद्र नरके यांना प्रास्ताविक केले. डॉ. चारुदत्त नरके यांनी आभार प्रदर्शन केले .

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + eight =