You are currently viewing उभादांडा मूठ केपादेवी मंदिराचा वर्धापन दिन  

उभादांडा मूठ केपादेवी मंदिराचा वर्धापन दिन  

वेंगुर्ला :

वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा- मूठ येथील श्री केपादेवी मंदिराचा ८ वा वर्धापन दिन सोहळा २० मे रोजी विविध धार्मिक विधी व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. सकाळी ८ ते १० वाजता श्री देवी केपादेवी मातेवर अभिषेक, सकाळी १० ते १२ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ ते १२.३० वाजता महाआरती, दुपारी १२.३० ते ४ वाजेपर्यंत महाप्रसाद, सायंकाळी ४ ते ७ वाजता सुश्राव्य भजनांचा कार्यक्रम ,रात्री १० वाजता जय हनुमान दशावतार (सावंतवाडी) मंडळाचे ट्रिकसिन युक्त दशावतरी नाटक “भैरव मर्दिनी ” होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री केपादेवी देवस्थान कमिटी व विश्वस्त आणि श्री केपादेवी देवस्थान उत्सव उपसमिती उभादांडा- मुठ वेंगुर्ला यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा