You are currently viewing चेन्नई ते मुंबई सायकल प्रवासावर निघालेले रोटरी सदस्य मालवणात

चेन्नई ते मुंबई सायकल प्रवासावर निघालेले रोटरी सदस्य मालवणात

चेन्नई ते मुंबई सायकल प्रवासावर निघालेले रोटरी सदस्य मालवणात

रोटरी क्लब मालवणसह रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० यांनी केले स्वागत

मालवण :

चेन्नई ते गेट वे ऑफ इंडिया (मुंबई) हा सुमारे २ हजार किलोमीटरचा टप्पा सायक्लोथॉन या उपक्रमाद्वारे म्हणजेच सायकल वरून प्रवास करून मानसिक आरोग्य जनजागृती आणि पोलिओ निर्मूलन संदेश देण्यासाठी मोहिमेवर निघालेले रोटरी क्लब ऑफ चेन्नई कोरात्तूर क्लबचे रोटेरियन सतिशकुमार व रोटरॅक्ट शांकरी यांचे मालवण शहरात आगमन झाले. यावेळी भरड नाका येथे रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे डीजी. रो. नासिरभाई बोरसादवला यांच्यासह संजय पुनाळेकर, राजेश घाटवळ आणि मालवण रोटरी क्लबचे सदस्य यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

चेन्नई ते गेट वे ऑफ इंडिया हा ४० दिवसांचा सायक्लोथॉनला २३ फेब्रुवारी रोटरीच्या वर्धापनदिनी चेन्नई येथून सुरुवात करण्यात आली. ६ राज्यातून हा सायकल प्रवास करण्यात येऊन ६० क्लबना भेटी देणार आहेत. ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत, नवनवीन मार्गावरील सायकल प्रवास अनुभवता आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी कुडाळ याठिकाणी भेट देत मालवण येथे नियमित ५० ते ६० किमी अंतर पार करीत दाखल झालो. सायकलवरून प्रवास करून मानसिक आरोग्य जनजागृती व पोलिओ निर्मूलन संदेश देत ४० दिवसात ही सायक्लोथॉन पूर्ण करणार आहोत, असे यावेळी रोटरी क्लब ऑफ चेन्नई कोरात्तूर क्लबचे रोटेरियन सतिशकुमार वं रोटरॅक्ट शांकरी यांनी सांगितले. मालवण भेटीनंतर ते देवगडच्या दिशेने रवाना झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा