You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय क्राॅस कंट्री निवड चाचणी स्पर्धा १७ रोजी होणार

सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय क्राॅस कंट्री निवड चाचणी स्पर्धा १७ रोजी होणार

कणकवली

महाराष्ट्र ॲथलेटिक्स् असोसिएशनच्या मान्यत्तेने सिंधुदूर्ग जिल्हा अँमेच्युअर ॲथलेटिक्स् असोसिएशन ,सिंधुदुर्ग आयोजीत प्रथम १६ वर्षा खालील मुला – मुलीं (२ कि.मी ),१८ वर्षाखालील मुला (६ कि.मी )- मुलीं (४ कि.मी) २०वर्षाखालील मुला (८ कि.मी )- मुलीं (६ कि.मी) व खुला गट पुरुष – महिला (१० कि.मी ) च्या जिल्हासतरीय क्राॅस कंट्री निवड चाचणी स्पर्धा १७ डिसेंबर २०२२ रोजी कणकवली किवा कुडाळ येथे घेण्यात येणार आहे.

तरी सर्व महाविद्यालयातील, क्रीडा मंडळ, क्लब व संस्थेतील मुला-मुलींनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा. स्पर्धेकरीता आपल्या नावाची नोंदणी त्वरीत करावी, स्पर्धा शुल्क प्रती खेळाडु रु.२००/- (नवीन खेळाडू वार्षिक नोंदणी शुल्क रु.१००/- भरावी लागेल. तसेच खेळाडू नोंदणी एएफआय, युआयडी क्रमांक असेल तर स्पर्धेत सहभागी होता येईल याची नोंद घ्यावी. स्पर्धेची नोंदणी अंतिम तारीख १६ डिसेंबर २०२२ आहे याची नोंद घ्यावी.अधिक माहितीसाठी रणजितसिंह राणे (अध्यक्ष ) – ९४२३०५१५७० , श्री. समीर जयवंत राऊत ( सह सचिव) ७९००१९७४७५ ,कु. अंजली गायकवाड (महिला तालुका प्रशिक्षक) – ८९२८८८३५९४ श्री. अजय सावंत (दोडामार्ग) यांच्याशी संपर्क साधावा तसेच प्रवेश अर्ज स भालचंद्र अपार्टमेंट, दत्त मंदिर जवळ, बीडयेवाडी, कलमठ , कणकवली, ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग येथे स्वीकारले जातील अशी माहिती अध्यक्ष रणजितसिंह राणे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा