You are currently viewing नवीन रास्तभाव दुकानांसाठी 31 जुलैपर्यंत अर्ज करा -प्र.जिल्हा पुरवठा अधिकारी मच्छिंद्र सुकटे

नवीन रास्तभाव दुकानांसाठी 31 जुलैपर्यंत अर्ज करा -प्र.जिल्हा पुरवठा अधिकारी मच्छिंद्र सुकटे

नवीन रास्तभाव दुकानांसाठी 31 जुलैपर्यंत अर्ज करा -प्र.जिल्हा पुरवठा अधिकारी मच्छिंद्र सुकटे

सिंधुदुर्गनगरी

पंचायती स्वयंसहाय्यता गट, सहकारी संस्था यांसारख्या सार्वजनिक संस्थांना किंवा सार्वजनिक न्यासांना रास्तभाव दुकानांचे परवाने देण्यास प्राथम्य देणे आणि महिला किंवा त्यांच्या समुदायाद्वारे दुकानांचे व्यवस्थापन करणे. त्यानुसार सध्याची रास्तभाव दुकाने, किरकोळ केरोसिन परवाने तसेच ठेवून आजमितीस रद्द असलेली किंवा यापुढे रद्द होणारी, राजीनामा दिलेली व लोकसंख्खा वाढीमुळे द्यावयाची नवीन तसेच विविध कारणांमुळे भविष्यात द्यावयाची नवीन रास्तभाव दुकाने व किरकोळ केरोसिन परवाने प्राथम्यक्रमानुसार मंजूर करण्यात यावेत असे निर्देश देण्यात आले आहेत. तरी विहीत नमुन्यामधील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दिनांक 31 जुलै 2023 पर्यंत संबंधित तालुक्याच्या तहसिलदार यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत दाखल करावेत, असे आवाहन प्र.जिल्हा पुरवठा अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.

रास्त भाव धान्य दुकाने मंजुरीसाठी प्राथम्यक्रम, पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था), नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था. संस्थानोंदणी अधिनियमांतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था किंवा सार्वजनिक न्यास, प्राथम्यक्रमानुसार रास्तभाव दुकान परवाने मंजूर होणाऱ्या दुकानांचे व्यवस्थापन महिला किंवा त्यांच्या समुदायांव्दारे करु शकणाऱ्या संस्थांचीच निवड करणे आवश्यक राहील.

शासन परिपत्रक,अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग,क्रमांक – राभादु-2117 /प्र.क्र. 157/ नापु-31 दि. 2/2/2022 अन्वये जाहीरनामा प्रसिध्द करण्यासाठी सुधारीत सहामाही कालबध्द कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील पुढील नमूद गावांसाठी केवळ रास्तभाव दुकाने परवाने मंजुरीकरीता दि. 3 जुलै 2023 रोजी जाहीरनामा प्रसिध्द करण्यात येत आहे.

सावंतवाडी तालुक्यातील  रास्त भाव धान्य दुकान परवाना मंजूर करावयाची गावे- भालावल, डिंगणे, गेळे, केसरी, फणसवडे, ओवळीये, पारपोली, वेत्ये, विलवडे, बावळाट,सावंतवाडी ई-वॉर्ड, सावंतवाडी ई1 वॉर्ड, सावंतवाडी सी वॉर्ड, तळवडे बादा.

दोडामार्ग तालुक्यातील रास्त भाव धान्य दुकान परवाना मंजूर करावयाची गावे- पाटये पुनर्वसन, परमे, हेवाळे, आंबडगांव, फुकेरी, झरेबांबर, भिकेकोनाळ, कुंभवडे, कोनाळ.

वेंगुर्ला तालुक्यातील रास्त भाव धान्य दुकान परवाना मंजूर करावयाची गावे- वायंगणी, मेढा.

कुडाळ तालुक्यातील रास्त भाव धान्य दुकान परवाना मंजूर करावयाची गावे- उपवडे, मिटक्याची वाडी,गावराई.

मालवण तालुक्यातील रास्त भाव धान्य दुकान परवाना मंजूर करावयाची गावे- बांदीवडे, आंबेरी, गोठणे, आडवली, महान, मालोंड, चुनवरे, खरारे, मालवण वॉर्ड नं.1, ओवळीये, खोटले, खाजणवाडी, तारकर्ली, घुमडे.

कणकवली तालुक्यातील रास्त भाव धान्य दुकान परवाना मंजूर करावयाची गावे- तळवडे, कुंभवडे, वारगांव, ओझरम, बेळणे.

देवगड तालुक्यातील रास्त भाव धान्य दुकान परवाना मंजूर करावयाची गावे- दाभोळे, गढीताम्हाणे, हडपीड, लिंगडाळ, मिठमुंबरी, नाद, पाटगांव पेंढरी सांडवे, कोर्ले.

वैभववाडी तालुक्यातील रास्त भाव धान्य दुकान परवाना मंजूर करावयाची गावे- सांगुळवाडी, वेंगसर, मौद आखवणे- गुरववाडी, दिगशी.

सदरचा जाहीरनामा शासन निर्णय क्र. राभादु/1716 प्र.क्र. 239 नापु-31 दिनांक 6 जुलै 2017 व शासन परिपत्रक क्रमांक- राभादु 2117/प्र.क्र.157/नापु-31 दि. 2 फेब्रुवारी 2022 मध्ये दिलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून तसेच या कार्यालयाकडील उपलब्ध माहितीच्या आधारे प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर माहितीमध्ये कोणताही बदल  झाल्यास सदरचा जाहीरनामा कोणत्याही टप्यावर रद्द करण्याबाबतचे अधिकार  या कार्यालयाने राखून ठेवले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा