You are currently viewing डेगवे येथील ४८ खेड्यांच्या श्री स्थापेश्वर मंदिरात “लक्षदिप ” कार्यक्रमाचे आयोजन…

डेगवे येथील ४८ खेड्यांच्या श्री स्थापेश्वर मंदिरात “लक्षदिप ” कार्यक्रमाचे आयोजन…

बांदा

सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गावात ४८ खेड्यांचा अधिपती असलेल्या व नवसाला पावणाऱ्या;हाकेला धावणाऱ्या” अशी सर्वदुर ख्याती असणाऱ्या श्री स्थापेश्वर,महालक्ष्मी मंदिरात “गुढीपाडव्याचे” औचित्य साधून भाविकासाठी “लक्षदिप” कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
सदर कार्यक्रम चैत्र शु.१ मराठी नवीन वर्ष अर्थात गुढीपाडवा शनिवार दिनांक २ एप्रिल २०२२ रोजी असून समाजातील मान्यवरांच्या व भाविकांच्या उपस्थितीत संध्याकाळी ठिक ६ वाजता श्री स्थापेश्वर मंदिरात होणार आहे.

प्रारंभी गावरहाटीची मंडळी श्री माऊली पंचायत देवता, डेगवे येथून गावहिताचे गाराणे घालून तेथून “ज्योत” वाजत गाजत ,फटाक्यांच्या अताष बाजीने श्री स्थापेश्वर मंदिरात आणली जाते.तेथे ६ फुट उंची असलेल्या समयीतील ज्योतीला मान्यवरांच्या शुभ हस्ते दिप प्रज्वलन करून “लक्षदिप”कार्यक्रमाचे उद्घाटन केले जाते.
त्यानंतर मंदिर परिसरात भाविक दिपप्रज्वलन करतात.लक्ष लक्ष दिव्यानी सारा परीसर उजळून निघतो.मराठी नव वर्षाचे असेही स्वागत कूले जाते.
सदर कार्यक्रम गेल्या १२ वर्षा पासून सुरु आहे.हा कार्यक्रम श्री स्थापेश्वर,महालक्ष्मी मंदिर जिर्णोध्दाराच्या निमित्ताने असुन समाजातील मान्यवरांनी या पुर्वी हजेरी लावली आहे.लक्षदिप कार्यक्रमाकरीता भाविकांना” एका दिव्या ” करीता देणगी मुल्य रुपये २० आहे. त्यामुळे भाविक ५-७-११-२१ असे लक्षदिप घेऊ शकतात. सदर लक्षदिप कार्यक्रमातून जमा झालेली रक्कम जिर्णोध्दाराच्या कामासाठी वापरली जाते.
त्यामुळे ४८ खेड्यातील भाविकांनी,मानकरी, देवस्थान समिती,हितचिंतकांनी,आप्तेष्टांनी, सर्व डेगवे ग्रामस्थांनी,महिलांनी सदर कार्यक्रमासाठी आवर्जूनउपस्थित रहावे अशी विनंती ग्रामस्थांच्या वतीने डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाचे सरचिटणीस श्री उल्हास देसाई यांनी केले आहे.

उल्हास देसाई,
सरचिटणीस,डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघ,मुंबई.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + seventeen =