You are currently viewing वेतन पथकातील रिक्त पदासंदर्भात शिक्षक भारतीने थेट शिक्षणमंत्र्याचे वेधले लक्ष…

वेतन पथकातील रिक्त पदासंदर्भात शिक्षक भारतीने थेट शिक्षणमंत्र्याचे वेधले लक्ष…

दोन दिवसांत अधिक्षक हजर होतील शिक्षण मंत्र्यांची ग्वाही

तळेरे : प्रतिनिधी

सिंधुदुर्गातील माध्य. वेतन पथक कार्यालयातील अनेक पदे रिक्त आहेत तर अनेक महिन्यांपासून या कार्यालयात अधिक्षक नसल्याने अनेक कामे पेंडिंग पडलेली आहेत.त्यामुळे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अनेक कामे कित्येक महिन्यांपासून रखडलेली असल्या प्रचंड कर्मचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी शिक्षक भारती संघटनेकडे आल्या होत्या.
आज शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष तथा राज्य प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर यांनी यासंदर्भात थेट शालेय शिक्षण मंत्री ना.दीपक केसरकर यांची भेट घेऊन थेट कैफियत मांडत लक्ष त्यांचे लक्ष या प्रशनाकडे वेधले आहे.
शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर येथे हिंदी मंडळाच्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री श्री दीपक केसरकर आले होते.
या दरम्यान शिक्षक भारतीच्या पदाधिकारी शिक्षणमंत्री केसरकर यांच्याबरोबर चर्चा करून समस्या सोडवण्याची विनंती केली.
जिल्ह्यातील वेतन पथक अधीक्षक रिक्त असल्यामुळे प्रचंड प्रलंबित कामांबद्दल लक्ष वेधले असता दोन ते तीन दिवसात वेतन पथक अधिक्षक हजर होतील असं आश्वासित करून त्याबाबतच्या सूचना शिक्षण अधिकाऱी डॉ मुश्ताक शेख यांना त्याठिकाणीच मंत्रीमहोदयांनी दिल्या.
यावेळी शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर सोबत, मुख्याध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री वामन तर्फे,शिक्षक भारतीचे राज्य प्रतिनिधी सी‌.डी.चव्हाण, जिल्हा सचिव समीर परब, सदाशिव सावंत आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो:

वेतन पथकातील रिक्त पदाबाबत शालेय शिक्षण मंत्री केसकर यांच्याशी चर्चा करताना शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर सोबत माध्.शिक्षणाधिकारी शेख,मुख्या.संघटनेचे जिल्हा अध्यक्ष वामन तर्फे व इतर

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − seventeen =