You are currently viewing सलग १९ व्या वर्षी बेलनदी ग्रुपचा रक्तदान महायज्ञ; पावशीत ८५ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग
Oplus_16908288

सलग १९ व्या वर्षी बेलनदी ग्रुपचा रक्तदान महायज्ञ; पावशीत ८५ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

रक्तपेढीकडून संजय कोरगावकर व श्रीपाद (पप्या) तवटे यांचा विशेष सन्मान

कुडाळ :

उन्हाळ्यामध्ये रक्ताच्या पुरवठ्याचे प्रमाण कमी आणि रक्ताची मागणी जास्त होत असल्यामुळे रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण होतो. याच अनुषंगाने रक्तपेढीने आवाहन केल्यामुळे भर उन्हाळ्यात दरवर्षी पावशीच्या बेलनदी ग्रुपच्यावतीने रक्तदात्यांना आवाहन करून रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. सलग १९ वर्षे या सामाजिक उपक्रम सुरू असून यावर्षी पावशी येथील शांतादुर्गा मंगल कार्यालयात आयोजित या शिबिराला रक्तदात्यांचा नेहमीप्रमाणेच उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात तब्बल ८५ रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबिर यशस्वी केले.

या स्तुत्य उपक्रमाला पावशीचे सुपुत्र व भांडुपचे माजी आमदार रमेश कोरगावकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, रणजित देसाई, संध्या तेरसे, राजू राऊळ, जि. प. उपाध्यक्ष दादा साईल, जि.प. सदस्य दीपक नारकर, रुपेश कानडे, कुडाळचे सभापती मिलिंद नाईक, उपसभापती सिताराम तेली, भाजप कुडाळ तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, अँड विवेक मांडकुलकर, संजय भोगटे, छोटू पारकर, बंड्या सावंत, आबा मुंज, मोहन सावंत, पं.स.सदस्या करुणा पावसकर, माजी नगराध्यक्ष विनायक राणे, आफ्रीन करोल, व अक्षता खटावकर, नगरसेविका नयना मांजरेकर, श्रेया गवंडे, ज्योती जळवी, निलेश परब व गणेश भोगटे, शिल्पा घुर्ये, मुक्ती परब, साधना माडये, राजेश म्हाडेश्वर, सचिन काळप, राजू गवंडे, सुनील बांदेकर, गुरु गडकर, मनोज वालावलकर, योगेश तुळसकर, राजन पावसकर, पावशी सरपंच वैशाली पावसकर, रोहिणी पाटील, जयेश चिंचळकर, दिनेश वारंग, दत्ता कोरगावकर, प्रकाश कोरगावकर, ॲड. रजत चव्हाण, रुणाल कुंभार,अनिल शेंलटे,सर्वेश वर्दम, मयू बांदेकर, निलेश म्हाडेश्वर, मंदार सावंत तसेच कुडाळ केमिस्ट असोसिएशनचे प्रसाद तेरसे, विनय वर्दे, हरिश्चंद्र लंगवे, दीपक परब, बाबू सावंत, सचिन कांबळी, शिवराम पणंदूरकर, प्रथमेश केळबाईकर, पप्पू तोरस्कर, विनायक केसरकर, बाळा केसरकर, नागेश कोरगावकर, सुभाष वाटवे, अभिषेक वाटवे, नागेश खोत, विजय तेंडुलकर, ब्रिजेश कोठावळे, दिनेश नाईक आदींनी उपस्थित दर्शवून शुभेच्छा दिल्या.

रक्तदाते बंड्या मांडकुलकर, अरुण घाडी, मेघनिल वाटवे, गिरीश सुकी, अंजली रेडकर, सचिन वारंग, प्रकाश ताम्हणेकर, दीपक रांजणकर, समीर लाड, आबा जुवेकर, गुरु केसरकर, सदानंद सावंत, संदीप खोत, राजेंद्र गोसावी, रवींद्र राऊळ, प्रवीण बहीरे, सचिन केरकर यांच्यासह ८५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

श्रीपाद उर्फ पप्या तवटे यांनी रक्तदान शिबिर करण्याचा उद्देश विशद केला. स्वरूप वाळके, राहुल पाटणकर, मनोज वालावलकर यांनी आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. संध्या तेरसे यांनी बेलनदी ग्रुप आणि पप्या तवटे व संजय कोरगावकर यांच्या पुढाकाराने बेलनदी ग्रुप आणि त्यांचे तरुण सहकारी यांच्यावतीने तसेच अन्य मंडळे, मित्रपरिवार यांच्या सहकार्याने रुग्णांना आवश्यक असणाऱ्या रक्ताचा सलग एकोणीस वर्षे रक्तदानरूपी महायज्ञ सुरू आहे. हे अतिशय कौतुकास्पद असल्याचे सांगून मंडळाला शुभेच्छा दिल्या.

संध्या पार्से , राहुल पाटणकर, मनोज वालावलकर, स्वरूप वाळके यांनी सलग १९ वर्षे उपक्रमाचे राखल्या बद्दल मंडळाचे कौतुक केले. सलग १९ वर्षे बेलनदी ग्रुप पावशीच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केल्याबद्दल जिल्हा रक्तपेढी (सिंधुदुर्ग) तर्फे संजय कोरगावकर आणि श्रीपाद तवटे यांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

शिबिर यशस्वी करण्यासाठी योगेश लाड, हर्षद तेली, पपी केसरकर, गिरीधर मुंज, बाबा तेली, प्रवीण केसरकर,तुळशीदास तेली,सदा मुंज, गुरु केसरकर, साईश केसरकर,अमोल तेली, स्वामी केसरकर, परेश केसरकर,शैलेश केसरकर, प्रशांत खोचरे, बबलू केसरकर,योगेश तेली,नागेश नार्वेकर, दिनेश मुंज, बाळा कुडतरकर, प्रसाद अंधारी, मयुरेश केसरकर, सायली केसरकर, योगिता केसरकर, श्रुती केसरकर, मीरा कोरगावकर, मिथिला खाडये, मृदुला खाडये, प्राप्ती लाड, सारा केसरकर, यथार्थ तेली, समर्थ केसरकर, गणेश बांदेकर, केदार कुडतरकर, दर्श कोरगावकर आदी बेलनदी ग्रुपच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा