You are currently viewing वडाला दोरी नाही, झाडच लावणाऱ्या विवेकी स्त्रीशक्तीला सलाम! 

वडाला दोरी नाही, झाडच लावणाऱ्या विवेकी स्त्रीशक्तीला सलाम! 

इचलकरंजी : प्रतिनिधी

 

वट पौर्णिमेच्या निमित्ताने वट वृक्षारोपण करण्याचा प्रघात इचलकरंजीच्या काही कार्यकर्त्यांनी यावर्षीही नियमितपणे चालू ठेवला आहे. निरामय हॉस्पिटल जवळील रुद्रभुमी (स्मशानभूमी) मध्ये होळीकट्टा महिला मंडळाच्या वतीने महिलांच्या हस्ते वृक्षारोपण केले.

 

एकीकडे समाजात परंपरागत पद्धतीने वडाला दोरा बांधून कोंडमारा करण्याचा प्रकार सुरू असताना या महिलांनी त्याला दिलेला विधायक आयाम महत्वाचा ठरतो आहे. यासाठी राष्ट्र सेवा दल इचलकरंजीचे कार्यकर्ता अवधूत खचनाळे आणि सुप्रिया कोष्टी यांनी पुढाकार घेतला. यावेळी त्यांची चिमुरडी इरा हिच्यासह

शुभांगी बन्ने, सरोजिनी गंदुगडे, कुसुम बन्ने, वैशाली वाली, धनश्री स्वामी, भाग्यश्री चिक्कुर्डे, छाया पतंगे, अमृता पिसे, तेजस स्वामी, महादेव बन्ने,राजू कोरे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा