You are currently viewing मुंगीबाई

मुंगीबाई

*जागतिक साकव्य विकास मंच तथा श्रीशब्द लालित्य समूह सदस्या कवयित्री सौ.अदिती धोंडी मसुरकर लिखित अप्रतिम बालकविता*

 

*मुंगीबाई*

 

मुंगीबाई मुंगीबाई

दंग असतेस फार

सदानकदा वाहतेस

कामाचा डोंगरभार

 

मुंगीबाई शिस्तीत कशी

रांगेमध्ये चालतेस

मैत्रिणीशी बोलताना

हळूच कान चावतेस

 

मुंगीबाई जलद वेचते

साखरेचे लहान कण

घालवत नाही वाया

दिवसातील एक क्षण

 

शोध लागता अन्नाचा

समुहाला बोलावते

शत्रुचा हल्ला होताच

एकजुटीने झगडते

 

भविष्याच्या काळजीने

धान्याचे कण साठवते

आळसावलेल्या माणसाला

कष्टाचे धडे शिकवते

 

*✍🏻 सौ. आदिती धोंडी मसुरकर*

*कुडाळ सिंधुदुर्ग*

प्रतिक्रिया व्यक्त करा