You are currently viewing जिल्ह्यात ‘संडे ऑन सायकलʼ या विशेष मोहीम चे आयोजन

जिल्ह्यात ‘संडे ऑन सायकलʼ या विशेष मोहीम चे आयोजन

जिल्ह्यात संडे ऑन सायकलʼ या विशेष मोहीम चे आयोजन

 सिंधुदुर्गनगरी

तंदुरुस्तनिरोगी व सक्रिय भारत घडविण्याच्या उद्देशानेतसेच जागतिक सायकल दिनाचे (World Bicycle Day) औचित्य साधून जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनजिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने रविवारदिनांक ०७ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात संडे ऑन सायकल’ ही विशेष मोहीम ग्रामपंचायत व तालुकास्तरावर राबविण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या आरोग्यदायी उपक्रमात सहभागी व्हावेअसे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केले आहे.

            भारत सरकारच्या फिट इंडिया मिशन आणि स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ही जिल्हाव्यापी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला आरोग्याचे महत्त्व पटवून देणे आणि गावोगावी स्वच्छतेचा संदेश पोहोचवणे हा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी यांना पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या उपक्रमांतर्गत तालुका आणि सर्व ग्रामपंचायत स्तरावर सायकल रॅलींचे आयोजन केले जाईल. या फेऱ्यांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक जीवनशैली आणि तंदुरुस्तीचा संदेश दिला जाईल. तसेच जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधीशासकीय अधिकारीकर्मचारीस्वच्छतादूतमहिला बचत गटांचे सदस्यशाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांचा सक्रिय सहभाग घेतला जाणार आहे. या मोहिमेत सहभागी होणाऱ्या सर्व नागरिकांची व संस्थांची अधिकृत नोंदणी फिट इंडिया मिशनच्या https://fitindia.gov.in/world-bicycle-day या संकेतस्थळावर केली जाणार आहे.

सायकल चालवणे हे केवळ आरोग्यासाठीच नव्हेतर पर्यावरणाच्या रक्षणासाठीही अत्यंत फायदेशीर आहे. एक सुदृढनिरोगी आणि सक्रिय समाज घडवण्यासाठी शारीरिक व्यायाम आवश्यक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नागरिकांनीविशेषतः तरुण पिढीने आणि विद्यार्थ्यांनी ७ जून रोजी आपल्या घराजवळील ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती स्तरावर होणाऱ्या संडे ऑन सायकल रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि या मोहिमेला एका लोकचळवळीचे रूप द्यावे.” असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा