आमदार नितेश राणेंचे व्हिजन

आमदार नितेश राणेंचे व्हिजन

सत्तेत नसतानाही मतदारसंघाला विकासाची दिशा…….

देवगड वैभववाडी मतदारसंघ हा अगदी पूर्वीपासूनच सत्तेत नसणाऱ्या आमदारांचाच मतदारसंघ राहिला आहे. आप्पा गोगटे आमदार असतानाही विरोधी पक्षाकडे देवगड मतदारसंघ होता. नितेश राणे सलग दोनवेळा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत आणि दोन्हीवेळा सता मात्र विरोधातच राहिली. परंतु सत्ता असो वा नसो नितेश राणे आणि त्यांच्या विकासाच्या कल्पनांना त्याचा काडीचाही फरक पडत नाही. आपल्या स्वकर्तृत्वावर आपल्या मतदारसंघात विकासाचे वारे वाहून आणण्याची त्यांची कल्पकता वाखाण्याजोगी आहे. सहा सात वर्षांपूर्वीचा देवगड मतदारसंघ आणि आजचा विकसित देवगड, वैभववाडी मतदारसंघच त्याची साक्ष देत आहे.
सिंधुदुर्गातील सी वर्ल्ड प्रकल्प, पंचतारांकित पर्यटन प्रकल्प, विमानतळ आणि एमआयडीसी हे रेंगाळलेले प्रकल्प जरी सरकारने पूर्ण केले तरी जिल्ह्यात विकासाची नांदी येईल आणि दरडोई उत्पन्नात वाढ होईल. भाजपाला सत्तेची संधी मिळाल्यास सी वर्ल्ड आणि नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्प नागरिकांना विश्वासात घेऊन केले जातील अशीही त्यांनी ग्वाही दिली. देवगड,कणकवली,वैभववाडीने आपल्याला गेली सहा वर्षे आमदारकीची संधी दिली आहे त्यामुळे या तिन्ही तालुक्यांकडे विकासाचे व्हिजन ठेऊन काम केले आहे. देवगड तालुका सहा वर्षांपूर्वी विकासाच्या दृष्टीने मागे होता परंतु पर्यटन दृष्ट्या चर्चेत आणून विकासात पुढे घेऊन जाण्याचे काम केले आहे. विरोधी पक्षात असल्याने सरकारच्या मदतीची वाट न बघता वॅक्स म्युझिअम, कंटेनर सिनेमा, वॉटर स्पोर्ट्स, हे सुरू करून पंचतारांकित असलेला क्लब महिंद्रा हॉटेलचा प्रकल्प देवगडात आणत आहे. १६० एकर मध्ये हा प्रकल्प असून मोठया प्रमाणात पर्यटक येऊन भविष्यात देवगडात रोजगार निर्मिती होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
तालुक्यात फळबाग आणि शेतीला प्राधान्य असून त्यालाही या प्रकल्पांमुळे उभारी येईल, यासाठी मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने आमदार नितेश राणे कार्यरत आहेत. विकासाचं एक व्हिजन घेऊन काम करत आहेत. वैभववाडी गेली अनेकवर्षं फक्त कोल्हापूर कडे जाताना लागणारे एक ठिकाण म्हणून ओळख असलेलं छोटंसं गाव, परंतु नितेश राणे यांच्या कल्पनेतून उभं राहिलेलं टुमदार वैभववाडी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे. कणकवलीत इंटरनॅशनल दर्जाची पोद्दार इंग्रजी माध्यमाची शाळा, गार्डन, असे विविध बदल घडवत कणकवली शहरात समृद्धीची गंगा आणण्याचे काम नितेश राणे करत आहेत.
सत्ताधारी आमदार, मंत्र्यांपेक्षाही आपला मतदारसंघ विकसित व्हावा, पर्यटक येऊन मतदारसंघात रोजगार निर्मिती व्हावी, लोकांच्या हाताना काम आणि फळबाग, शेतमालाला चांगला भाव मिळावा म्हणून आमदार नितेश राणे मतदारसंघात करत असलेल्या कामांना तोड नाही. त्यांच्या विकासाच्या कल्पनेतून होत असलेले मतदारसंघातील बदल नकीच भविष्यात देवगड कणकवली,वैभववाडी मतदारसंघ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करेल याबद्दल दुमत नाहीच.

प्रतिक्रिया व्यक्त करा