सिंधुदुर्गातील डॉक्टरांचा सहभाग
सावंतवाडी :
इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) महाराष्ट्र राज्याच्या वतीने ४ ऑगस्ट रोजी सकाळी ६ ते ५ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत पुकारण्यात आलेल्या २४ तासांच्या वैद्यकीय सेवा बंद आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॉक्टरांनी पाठिंबा जाहीर केला आहे. सीसीएमपी (CCMP) पूर्ण केलेल्या बीएचएमएस (BHMS) डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी देण्याच्या प्रस्तावित निर्णयाच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशन, सिंधुदुर्गचे अध्यक्ष डॉ. संजय केसरे यांनी दिली.
या आंदोलनाद्वारे आधुनिक वैद्यकाची गुणवत्ता, रुग्णसुरक्षा आणि वैद्यकीय नैतिकतेचे संरक्षण करण्याची भूमिका संघटनेने घेतली असून, हा लढा रुग्णहितासाठीच असल्याचे डॉ. नवांगुळ यांनी स्पष्ट केले.
