You are currently viewing शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे चरित्र ‘बेल भंडारा’ आता ऑडिओबुकमध्ये ऐकता येणार!

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे चरित्र ‘बेल भंडारा’ आता ऑडिओबुकमध्ये ऐकता येणार!

जेष्ठ इतिहास संशोधक, पद्मविभूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे आज (29 जुलै) वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहेत. या निमित्ताने ‘स्टोरीटेल मराठी’ने महाराष्ट्राच्या या लाडक्या सुपुत्राचे डॉ. सागर देशपांडे लिखित ‘बेल भंडारा’ हे चरित्र रसिकश्रोत्यांच्या आवडत्या ‘ऑडिओबुक’मध्ये या विशेष दिनाचे औचित्य साधून आणले आहे. बाबासाहेबांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचं अवघं आयुष्य डॉ. सागर देशपांडे यांनी शब्दबद्ध केलेलं ‘बेल भंडारा’ बाबासाहेबांच्या शतकोत्सवी वर्षात रसिकांना ‘ऑडिओबुक’मध्ये ऐकायला मिळणं हा दुग्धशर्करा योग म्हणता येईल.

बाबासाहेब पुरंदरे’ हे नाव आज महाराष्ट्रालाच काय संपूर्ण देशाला सुपरिचित आहे. बाबासाहेबांचं व्यक्तिमत्त्व नेमकं ‘घडलं’ कसं हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांच्याच मनात असते. बाबासाहेबांनी स्वतःचं चरित्र लिहावं यासाठी त्यांना अनेकांनी अनेकदा विनवलं, त्यात अनेक दिग्गजांसह अगदी पु.ल.देशपांडेही होते. परंतु, बाबासाहेबांनी फारसं कधी मनावर घेतलं नाही. ते फक्त आणि फक्त शिवमय होऊन राहिलेत.

‘बाबासाहेब म्हणजे एक अद्भुत चमत्कारच असावेत! अशा या आपल्या बाबासाहेबांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचा जीवनप्रवास मर्यादित शब्दांमध्ये आपल्यासमोर मांडणं म्हणजे एकप्रकारे लेखकासमोर ‘शिवधनुष्य’ पेलण्यासारखंच होतं. ते डॉ. सागर देशपांडेंनी उत्तमरित्या पेललं आहे. आवाजात स्टोरीटेल मराठीवरील ‘बेल भंडारा’ ऑडिओबुकला नचिकेत देवस्थळी या अभिनेत्याचा फ्रेश आवाज लाभला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 3 =