You are currently viewing प्रवीणभाई भोसले…

प्रवीणभाई भोसले…

*प्रवीणभाई भोसले…*

*राजकारणातील निष्कलंक व्यक्तिमत्त्व*

माजी राज्यमंत्री मा.प्रवीणभाई भोसले यांचा आज अमृतमहोत्सवी वाढदिवस..! आजचा त्यांचा वाढदिवस सर्वपक्षीय नेत्यांकडून साजरा होत आहे हीच तर त्यांच्या निष्कलंक, तत्वनिष्ठ राजकीय कारकिर्दीची पोच पावती..!
राष्ट्रवादी काँग्रेसचे शिल्पकार मा.शरदचंद्र पवार साहेबांवर अपार निष्ठा अन् निस्सीम श्रद्धा असलेले पवार साहेबांचे निष्ठावंत असलेले प्रवीणभाई भोसले यांचे राजकारण म्हणजे स्वच्छ, एका सरळ मार्गाने चालणारे. त्यांना कधीच छक्के पंजे जमले नाहीत. आमदारकीच्या टर्म मध्ये शरद पवार साहेबांनी प्रवीणभाईंवर विश्वास दाखवत राज्यमंत्रीपद देत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली होती. आपल्या पदाला न्याय देत प्रवीण भाईंनी सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय उभारणीत मोलाचे योगदान दिले. शरद पवारांनी राज्यासाठी आणलेली १००% फलोत्पादन योजना जिल्ह्यात फळास येण्यात देखील प्रवीण भाईंचे मोठे योगदान आहे.
आताचे कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांना देखील प्रवीण भोसलेंनी राजकारणात आणले. भोसले घराणे हे धार्मिक..! राजघराण्याच्या पाटेश्वराचे मूळ स्थान भोसलेंच्या तिरोडा येथील घरात आहे. तिथेच आजही त्यांचे सर्व धार्मिक उत्सव होतात. भाई गावातील सर्व धार्मिक कार्यक्रमात सहभागी असतातच परंतु सावंतवाडीत देखील प्रत्येकाच्या निमंत्रणाचा मान ठेऊन उपस्थित राहतात हे तितकेच खरे..! मंत्रिपद मिळविले तरी प्रवीण भाईंनी संपत्ती, माया गोळा केली नाही की स्वतःसाठी काही केलं नाही. त्यांचे सावंतवाडीतील घर म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांचे बसण्याचे ठिकाण.. त्यांच्या घरात सर्वसामान्य लोकांचेही आदरातिथ्य केलं जातं हे विशेष..! डी.जी.सावंत, गजानन नाटेकर, अशोक दळवी हे त्यांचे तेव्हाचे शिलेदार. बदलत्या राजकारणात ते दीपक केसरकर यांना जाऊन मिळाले परंतु प्रवीण भाई आजही त्यांची विचारपूस करतात हे त्यांचं वैशिष्ट्य..!
आज प्रवीणभाईंचा अमृतमहोत्सवी वाढदिवस सर्वपक्षीय नेत्यांकडून साजरा केला जात आहे यातच त्यांची महानता समजून येते. जिल्ह्याच्या विकासात हातभार लावणारे जिल्ह्यातील निष्कलंक व्यक्तिमत्त्व माजी राज्यमंत्री मा.प्रवीण भाई भोसलेंना संवाद मिडियाकडून अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि भावी वाटचालीस सदिच्छा..!

प्रतिक्रिया व्यक्त करा