You are currently viewing ग्रा.पं. निवडणुकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेचे गावगावातील अस्तित्व दाखवून देऊ – सुनील पारकर

ग्रा.पं. निवडणुकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेचे गावगावातील अस्तित्व दाखवून देऊ – सुनील पारकर

मालवण

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने तयारी केली होती. मात्र या निवडणुकीत भाजपशी युती करण्याचे आदेश वरिष्ठांकडून आल्याने एक पाऊल मागे येऊन उमेदवारीबाबत आम्ही तडजोडी करणार आहोत. या दृष्टीने मालवण तालुक्यातील गावागावातील परिस्थितीचा आढावा घेऊन त्या त्या भागातील दोन्ही पक्षाच्या ताकदीनुसार उमेदवार ठरविले जातील. आम्ही कुठेही कमी नसून प्रत्येक गावात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची ताकद आहे. ग्रा. प. निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे गावागावातील अस्तित्व दाखवून देऊ, असे प्रतिपादन बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मालवण तालुका निरीक्षक सुनील पारकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले.

मालवण येथील बाळासाहेबांची शिवसेना पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी उपजिल्हाप्रमुख महेंद्र सावंत, उपजिल्हाप्रमुख चंद्रशेखर राणे, कणकवली समन्वयक व मालवण तालुका निरीक्षक सुनील पारकर, कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्रप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख विश्वास गावकर, राजा गावकर, किसन मांजरेकर, अरुण तोडणकर, ऋत्विक सामंत, नीलम शिंदे, नेहा तोडणकर, निकीता तोडणकर, कविता मोंडकर, स्वप्नाली माळकर, गोपाळ शेलटकर, राजा तोंडवळकर, शेखर तोडणकर, सागर घाडगे आदी व इतर उपस्थित होते.

यावेळी सुनील पारकर म्हणाले, ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप व बाळासाहेबांची शिवसेना पक्ष यांच्यात युती होत असल्याने त्या त्या गावातील स्थानिक पातळीवर तडजोडी करण्यात येतील. भाजपकडून माजी खासदार निलेश राणे व तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी प्रथम दोन्ही पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरून त्यानंतर चर्चेतून दोन्ही पक्षाकडून कोणाची उमेदवारी कायम ठेवायची याबाबत निर्णय घेण्यात येईल. आमचा पक्ष प्रत्येक गावात आपली ताकद व अस्तित्व दाखविणार आहे. यात युतीला कोणतीही बाधा येणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. तसेच उमेदवारी बाबत जे नाराज होतील त्यांची मनधरणी करून पक्ष संघटनेला बाधा पोहचणार नाही याचीही काळजी घेतली जाईल, असेही पारकर म्हणाले.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही मालवण तालुक्यातील निवडणूक होणाऱ्या सर्व ५५ ग्रामपंचायती बाबत आढावा घेत आहोत. संघटनेची बैठक घेऊ पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याकडून गावगावातील परिस्थिती व समस्या यांची माहिती घेत आहोत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनेत सुसूत्रता यावी यासाठी आढावा बैठक घेत आहोत. गावागावात भेटी देऊनही माहिती घेऊन निवडणुकीचे नियोजन करण्यात येणार आहे, असेही सुनील पारकर म्हणाले.

यावेळी शिवराज्य ब्रिगेड संस्थेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी किसन मांजरेकर यांची नियुक्ती केल्याचे पत्र संस्थेचे जिल्हाध्यक्ष सुनील पारकर यांनी किसन मांजरेकर यांना सुपूर्द केले. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मांजरेकर यांचे अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one + two =