You are currently viewing कणकवली तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा नियोजन सभेचे १९ रोजी आयोजन….

कणकवली तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा नियोजन सभेचे १९ रोजी आयोजन….

क्रीडा शिक्षकांना उपस्थित राहण्याचे आवाहन..

कणकवली

कोरोनाच्या प्रतिबंधना नंतर प्रथमच सन-२०२२/२३ या
शैक्षणिक वर्षात शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यास शासनाने मान्यता दिली असून त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा स्पर्धा आयोजन पुढील महिन्यात सुरु करण्यात येणार आहे.
तालुकास्तरावर दहा खेळांच्या ( कुस्ती,योगा,कॅरम, तायक्वांडो,कबड्डी,खो खो, क्रिकेट, फुटबॉल,
व्हाॅलीबॉल,व ॶॅथलेटिक्स/ मैदानी) क्रीडा स्पर्धांचे आयोजन व नियोजन करण्याच्या दृष्टीने कणकवली तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धाच्या आयोजनाची सभा क्रीडा परिषेदेचे अध्यक्ष श्री. आर.जे.पवार तहसिलदार कणकवली यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि. १९/१०/२०२२ रोजी दुपारी २.३० वाजता तहसिलदार कार्यालय कणकवली येथे संपन्न होणार आहे.
तरी कणकवली तालुक्यातील प्रत्येक प्रशालेतील क्रीडा शिक्षकांनी तसेच क्रीडा प्रेमी व तालुक्यातील एकविध खेळ संघटना असोसिएशनचे पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन कणकवलीचे गटशिक्षणाधिकारी किशोर गवस आणि कणकवली तालुका समन्वयक बयाजी बुराण यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा