You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेस युवती सिंधुदुर्गच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत तर व समुहमध्ये चिमणी पाखर डान्स अकॅडमी विजेते ….

राष्ट्रवादी काँग्रेस युवती सिंधुदुर्गच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत तर व समुहमध्ये चिमणी पाखर डान्स अकॅडमी विजेते ….

कुडाळ
राष्ट्रवादी युवती काँग्रेस, सिंधुदुर्गच्यावतीने जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या युवतींचा सन्मान आणि भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धाचे आयोजन सिद्धिविनायक हॉल येथे करण्यात आले होते या सोहळ्याचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते झाले यावेळी
पक्षाचे प्रदेश संघटक काका कुडाळकर ओबीसेल जिल्हा अध्यक्ष बाळ कनयाळकर जिल्हा सरचिटणीस भास्कर परब सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी प्रा सचिन पाटकर युवती जिल्हाध्यक्षा सौ सावली पाटकर रुपेश जाधव प्रतीक सावंत नितीन गोवेकर देवेंद्र टेमकर नजीर शेख सर्वेश पावसकर
नीतीन गोवेकर किरण नाईक शुभम धुरी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते जिल्ह्यातील स्पर्धक पालक आदी उपस्थित होते एकेरी नृत्य स्पर्धेत द्वितीय पुजा राणे तृतीय सोहम जांभोरे उत्तेजनार्थ नेहा जाधवसंजना पवार यांनी मिळवला तर समूहनृत्य स्पर्धेत द्वितीय कलानक्षत्र ग्रुप कुडाळ तृतीय एम जे डान्स ॲकॅडमी सावंतवाडी यांनी मिळविला स्पर्धेचे परीक्षण परीक्षक सुप्रिया ढोके देवगड संजय कांबळे कणकवली महेश जांभोरे सावंतवाडी यांनी केले स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी बाळ कनयाळकर भास्कर परब उस्मानाबाद जवळा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी मल्लिनाथ डीग्गे महादेव मोधे शिवशरण कारभारी बाबाजीं निमशेट्टी सुनील धरणे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सचिन पाटकर शुभम धुरी यांनी केले
कुडाळ
राष्ट्रवादी काँग्रेस युवती आयोजित एकेरी नृत्य स्पर्धेत विजेत्या मृणाल सावंत तर ग्रुपमध्ये चिमणी पाखर डान्स यांना गौरवताना बाळ कनयाळकर सावली पाटकर भास्कर परब प्रतीक सावंत पक्षाचे पदाधिकारी व मान्यवर

प्रतिक्रिया व्यक्त करा