You are currently viewing मणेरी अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू…

मणेरी अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू…

मणेरी अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू…

दोडामार्ग
दोडामार्ग – बांदा मार्गावर मणेरी कलमठाणा येथे एका वळणावर झालेल्या दुचाकीच्या स्वंय अपघातात जखमी झालेल्या सासोली येथील पाटये पुनर्वसन वसाहतीतील युवक भाविक गुरूदास गवस (वय 18) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.त्याला अधिक उपचारासाठी बांबोळी येथे दाखल केले होते.युवकाच्या या अपघाती निधनामुळे गावावर शोककळा पसरली.

या युवकाने नुकतेच कॉलेज पूर्ण केले होते. काही दिवसांपूर्वी त्याने नवीन मोटार सायकल घेतली होती. तो व त्याचा मित्र गुरूवारी (ता.25) सायंकाळी दोडामार्ग येथून मोटार सायकल (एमएच 07 टी 1237) घेऊन घरी जात असताना मणेरी कलमठाणा येथे वळणावर दुचाकी रस्ता सोडून बाजूला जाऊन झालेल्या अपघातात भाविक गवस जखमी झाला. तर मागे बसलेल्या युवकाने उडी मारल्याने तो बचावला.अपघाताची माहिती मिळताच काही जणांनी
भाविकला जखमी अवस्थेत येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले.प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात दाखल केले. पण डोक्याला गंभीर इजा झाल्याने उपचारादरम्यान त्याचे निधन झाले.शुक्रवारी दुपारनंतर त्याचा मृतदेह घरी आणण्यात आला.कुटुंबीयांनी केलेला आक्रोश पाहून सर्वांचे डोळे पाणावले. त्याच्या मागे आई वडील, लहान जुळे भाऊ असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा