You are currently viewing मालवणात दांडी येथे २७ ते ३० एप्रिल रोजी भव्यदिव्य ‘गाबीत महोत्सव’ आयोजन

मालवणात दांडी येथे २७ ते ३० एप्रिल रोजी भव्यदिव्य ‘गाबीत महोत्सव’ आयोजन

मालवण :

मालवणातील दांडी किनाऱ्यावर २७ ते ३० एप्रिल या कालावधीत होणारा गाबीत महोत्सव हा विखूरलेल्या गाबीत समाजाला एकत्र आणणे तसेच गाबीत बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी भरविण्यात येत आहे.

महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, कर्नाटक अशा चार राज्यातील गाबीत बांधव या मेळाव्यास उपस्थित राहणार असून विविध कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे. या महोत्सवाच्या नियोजनासाठी २१ समित्या गठीत करण्यात आल्या असून सर्व गाबित समाज बांधवांच्या सहकार्याने हा महोत्सव यशस्वी करणार आहोत, अशी माहिती अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ व गाबीत समाज महाराष्ट्र आणि गाबीत समाज सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि गाबीत समाज मालवण तालुक्याच्या यजमानातून २७ ते ३० एप्रिल या कालावधीत “गाबीत महोत्सवाचे” आयोजन मालवण दांडी किनारी करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मालवण धुरीवाडा येथील संस्कार हॉल येथे गाबीत समाजाचे जिल्ह्यातील सर्व तालुका शाखांचे पदाधिकारी आणि गाबीत समाजातील कार्यकर्त्यांची बैठक संपन झाली.

यावेळी अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष परशुराम उपरकर, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, सरचिटणीस महेंद्र पराडकर, हरी खोबरेकर, जिल्हा संघटक रविकिरण तोरसकर, मालवण तालुकाध्यक्ष डॉ. प्रमोद कोळंबकर, उपाध्यक्षा सौ. अन्वेषा आचरेकर, मेघा गांवकर, बाबी जोगी, सौ. सेजल परब, राजू परब, वेंगुर्ले तालुका सचिव किरण कुबल, दिलीप घारे, मेघनाद धुरी, देवगड तालुका सचिव संजय बांदेकर, सौ. उष:कला केळुसकर, नारायण धुरी, सावंतवाडी तालुकाध्यक्ष ऍड. संदीप चांदेकर, सचिव दिपक तारी, सौ. दिक्षा ढोके, स्वाती कुबल, रश्मीन रोगे, अन्वय प्रभू, पांडुरंग कोचरेकर, भूषण मेतर आदी व इतर गाबीत समाज बांधव उपस्थित होते.

बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत परशुराम उपरकर म्हणाले, गाबीत महोत्सवाच्या सांगता सोहळा ३० एप्रिल रोजी होत आहे. १ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा जाहीर झाला. त्याचे यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष असून महोत्सवाच्या सांगतेला हा योग जुळून आला आहे, असेही उपरकर म्हणाले.

गाबीत महोत्सवासाठी सर्व नियोजन करण्यात येत आहे. सर्वांना जबाबदारी देण्यात आली आहे. नियोजनासाठी दांडीसह मालवण किनारपट्टीवरील वायरी, तारकर्ली, देवबाग, मेढा, धुरीवाडा, कोळंब, सर्जेकोट, तळाशील तोंडवळी, आचरा या भागातील गाबीत समाज कार्यकर्त्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीची बैठक २५ मार्च रोजी रामेश्वर मच्छिमार सोसायटी दांडी येथे होणार आहे. तर देवगड बैठक २६ रोजी होणार आहे. असेही उपरकर म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरामारात सहभागी असणारा गाबीत समाज असून मालवण येथे महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला उभारून आरामाराची उभारणी केली. म्हणूनच हा पहिला गाबीत महोत्सव मालवणात आयोजित करण्यात येत असून महोत्सवाच्या पहिल्या दिवशी मोरयाचा धोंडा येथे पूजन करून सागरात बहुसंख्य नौकांच्या उपस्थितीत १०० मशाली प्रज्वलीत करण्यात येणार आहेत, त्यांची एकत्रित मशालज्योत महोत्सव स्थळी ठेवण्यात येणार आहे, असे परशुराम उपरकर म्हणाले.

 *गाबीत भूषण सन्मान* 

महोत्सवात राष्ट्रीय व राज्य स्तरावर कार्य करणाऱ्या गाबीत बांधवांचा गाबीत भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. देवगड येथील मंडळाचा शिमगोत्सव साजरा होणार आहे. तर २९ एप्रिल रोजी सागरी सुंदरी स्पर्धा होणार आहे. ऑर्केस्ट्रा, नृत्य सादरीकरण तसेच तीन दिवस विविध विषयांवर परिसंवाद होणार आहेत. तसेच महोत्सवात गाबीत बांधवांचे विविध स्टॉल असणार असून यामध्ये मासळी वर आधारित पदार्थांची रेलचेल असणार आहे. मच्छिमारीच्या विविध पारंपारिक पद्धती याविषयी युवकांना व येणाऱ्या पर्यटकांना प्रत्यक्षिकासह माहिती देण्यात येणार आहे. महोत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यात तालुकावार गाबीत बांधवांच्या क्रिकेट स्पर्धा होणार असून त्यातील विजेत्यांची अंतिम फेरी मालवणात २६ एप्रिलला दांडी झालझुल मैदानावर होणार आहे.

*गाबीत ध्वज अनावरण होणार* 

गाबीत महोत्सवाच्या निमित्ताने गाबीत ध्वजाचे अनावरण करण्यात येणार आहे. महोत्सवाच्या व्यासपीठाला मच्छिमार नेते कै. ज्ञानेश देऊलकर यांचे, परीसंवाद मंडपास स्वातंत्र्य सैनिक कै. हिरोजी तोडणकर यांचे, प्रवेशद्वारास हुतात्मा दत्ताराम कोयंडे यांचे तर महोत्सव मंडपास मालवणचे माजी उपनगराध्यक्ष सुबोध आचरेकर यांचे नाव देण्यात येणार आहे. या महोत्सवासाठी पर्यटन महामंडळ, मत्स्य विभाग, बँका, एलआयसी अशा विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनाही आमंत्रित करण्यात आले असून त्यांच्या मार्फत गाबीत बांधवाना विविध विषयांवर मार्गदर्शनही करण्यात येणार आहे, असेही उपरकर यांनी सांगितले.

*राजकीय व्यासपीठ नसणार* 

महोत्सवासाठी गाबीत बांधवांकडूनच निधी संकलन करण्यात येत आहे. राजकीय पादत्राणे बाजूला ठेवून हा महोत्सव होणार आहे. गाबीत बांधवांकडूनच मदत घेण्यात येत असून कोणतीही राजकीय मदत घेतली जाणार नाही. महोत्सवाचे व्यासपीठ हे गाबीत समाजातील बांधवाना असणार आहे. समाज बांधव यांच्या कलागुणांचे दर्शन घडणार असून व्यासपीठावर कोणतीही राजकीय भाषणे होणार नाहीत, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

*संवाद मिडिया*

 

*न्यू-मॅक्स डेव्हलपर्स🏠च्या “रेन्बो हिल्स🌈” मध्ये ग्राहकांसाठी🥰 खास ऑफर”…!*

 

*सविस्तर वाचा👇*

—————————————————-

🏨🌴🏨🌴🏨🌴🏨🌴🏨🌴🏨

 

*मळगाव-कुंभार्ली🏕️* येथील ️ *रेरा ॲक्ट📜* नुसार *मान्यता📃* असलेल्या *न्यू-मॅक्स डेव्हलपर्स🏠* यांच्या *”रेन्बो हिल्स🌈”* मध्ये *ग्राहकांसाठी🥰* आम्ही देतोय खास *”गुढीपाडवा ऑफर”…!🚩💥🤩*

 

*🔹सॅम्पल रेडी*

*🔸गृह कर्जाची सुविधा*

*🔹दिलेल्या वेळेच्या अगोदर पझेशन…!*

 

*🛑रेरा नं. P52900022211*

 

*_फक्त ५१ हजारात बुकिंग💰 करा, सोबत स्टॅम्प ड्युटी 🏷️ आणि 🤩 रजिस्ट्रेशनसह जीएसटी फ्री मिळवा…!🤟_*

 

👉तात्काळ *बुकिंग📃* केल्यास अजून *५० हजाराची💰* सवलत…!तर *ऑफर फक्त पुढील १० दिवसांसाठी🗓️* मर्यादित…!

 

*🏚️New Max Developers🏘️*

*यांचा चौथा महत्त्वकांक्षी प्रकल्प*

*🌈”रेन्बो हिल्स”🏞️*

 

*🛑आम्ही मळगाव येथे देतोय:-*

👉1RK १३लाखात

👉1BHK १६ लाख३५ हजारात

👉2 BHK २३ लाखात

 

*_मग वाट कसली बघताय..!🤔 ५१ हजार 💰 रुपये द्या..! आणि आपला हक्काचा 🏦 फ्लॅट🏢 तात्काळ बुक करा…!🔖_*

 

🛑आमची वैशिष्ट्ये:-👇

♦️सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन हाकेच्या अंतरावर…!🗣️

♦️मुंबई-गोवा महामार्ग अवघ्या पाच मिनिटावर…!🛣️

♦️सावंतवाडी बाजारपेठ पाच किलोमीटरवर…!🛍️

♦️निसर्गरम्य आणि शांत वातावरणात राहण्याचा आनंद.!🌴

♦️उच्च प्रतीचे बांधकाम आणि सुसज्ज इमारती…🏢

 

*🏡आमचा पत्ता:-*

सावंतवाडी रेल्वेस्टेशन जवळ, शालू हॉटेलच्या बाजूला, कुंभार्ली-मळगाव, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

 

*📲संपर्क:-*

9653693804 / 8104829770

 

*—————————————————–*

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia/

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा