You are currently viewing मनसेत जोरदार इनकमिंग सुरू…

मनसेत जोरदार इनकमिंग सुरू…

नानेली घाडीवाडी येथील ग्रामस्थांचा मनसेत प्रवेश..तर चार दिवसांपूर्वी नार्वेकर वाडीतील युवकांनी केला होता पक्षप्रवेश

पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत नानेली ग्रामस्थांनी हाती घेतला मनसेचा झेंडा

माणगाव खोऱ्यात मसनेचा जोरदार झंझावात चालू झाला असून मनसेचे पक्षप्रमुख श्री.राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन नानेली घाडीवाडी येथील ग्रामस्थांनी माजी आमदार जीजी उपरकर यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला.तर काही दिवसांपूर्वी नानेली नार्वेकर वाडीतील युवकांनी देखील मनसेचा रस्ता धरल्याने मनसेने जिल्ह्यात संघटना बांधणीची घोडदोड वेगात चालू झाली असल्याचे दिसत आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांच्या नाकर्तेपणाचा पाढा ग्रामस्थांनी प्रवेशावेळी वाचला.बंटी नेवगी, गिरीश नेवगी,अजित नेवगी,उदय नेवगी,अमन नेवगी,कांचन नेवगी,तुषार धुरी,दिनेश मुणगेकर,प्रकाश मेस्त्री,राकेश कळसुलकर मयुरेश घाडी यांसह असंख्य ग्रामस्थांनी मनसेत जाहीर प्रवेश केला.यावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर,उपतालुकाध्यक्ष सचिन सावंत,शाखाध्यक्ष अनिकेत धुरी व अभिषेक घाडी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा