You are currently viewing सावंतवाडी भाजपा उपाध्यक्ष शेखर गांवकर यांना पितृशोक

सावंतवाडी भाजपा उपाध्यक्ष शेखर गांवकर यांना पितृशोक

माजी सैनिक दादा कवठणकर यांचे निधन

सावंतवाडी

सातार्डा कवठणी येथील रहिवासी माजी सैनिक आत्माराम विष्णू गांवकर उर्फ दादा कवठणकर (८६) यांचे रविवारी सकाळी ११ च्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. भारतीय सैन्यदलात त्यांनी दहा वर्षे सेवा बजावली होती. निवृत्तीनंतर ते सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत होते. कवठणी ग्रामपंचायतचे ते दहा वर्षे सदस्य होते. तर पाच वर्ष उपसरपंच म्हणून त्यांनी कार्यभार पाहिला होता. टिळक ग्रंथालयाचे ते वीस वर्षे सचिव राहिले होते.

त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई, दोन भाऊ, बहीणी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. भाजपचे सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष शेखर गावकर यांचे ते वडील तर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती सौ. शर्वाणी गावकर यांचे ते सासरे होत. त्या निधनामुळे कवठणी परिसरात शोक व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − 14 =