You are currently viewing खरा’…पाऊस.

खरा’…पाऊस.

*डॉ. शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन,मुक्ताई नगर, जळगावचे सदस्य लेखक कवी बबन आराख लिखीत अप्रतिम काव्यरचना*

*’खरा’…पाऊस…!*

तुम्ही पहिला का, कधी…?
‘खरा’….पाऊस !…

गरम,झालं असेल तुम्हालां
बंगल्यात बसूंन…
तेंव्हा, भिजला असेल तुम्ही…
हाऊस म्हणून…!

गेले असांल दूर…
कधी,हिरव्या डोंगरावर…!
आणि, भिडली असेल नजर…
तुमची,दाट काळ्या मेघावर..!

बस्स..!
असाच,तुमचा पाउस.‌‌‌..
आहे, आंम्हा ठाऊक…!
नको भ्रमांत राहू…
तुमचा, कागदाचा पाऊस..!

‘खरा ‘…पाऊस…..
पाहीला आम्ही…!
लाही-लाही, होई अंगाची
भिजला होता, फाटका कुर्ता…
पुसूंन,घाम त्याचा…!

थांबला नाही कधी…
तळपत्या उन्हात..!
लागल्या होत्या धारा…
निथरत होता घाम…कष्टात सारा..!

नांगरून- वखरूंन केले…
निट सारे रानं..!
वाट पाहून हरले..‌‌.
मिरगात देहभान…!

मग,दूर कुठे पडलां…
थोडा पाऊस…!
इथं, अर्धा-तसाच् गेलां…
कोरडा…मिरग…!

काळजावर दगड ठेऊन…
पेरलं, शेत त्यान..!
कवळी कोमं,आली उगून…
भेदून काळी, जमीन…!

गेला पाऊस उघडून…..
सुकूं लागली पिकं…!
हारपली, संमदी भुख…
आभाळ पाही,डोळे मिटुन…!

आला मग,आसा…‌
मुसळधार पाऊस…!
वाहून गेले,सारे…
उभे पिकं..!

पाहीला का, तुम्ही…?
‘खरा’…पाऊस…!
जगणं शिकवतो…
मरणं…शिकवतो..!

पाऊस… आमचा
असा असतो…!
खरंच, खरा असतो…!

– बबन आराख.
गा़ंगलगाव, ता.चिखली
(बुलडाणा)
7875701806

 

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + fifteen =