You are currently viewing *श्री नाथ षष्ठी निमित्ताने संत एकनाथांच्या चरणी

*श्री नाथ षष्ठी निमित्ताने संत एकनाथांच्या चरणी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी अरुण वी देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*श्री नाथ षष्ठी निमित्ताने संत एकनाथांच्या चरणी*

———————————————

गोदातीरीच्या पैठण नगरीला

नाथांचा सहवास हो लाभला

समाज-शिक्षक नाथमहाराज

हीच ओळख त्यांची आजला ।।

 

लोकमनातली जळमटे दूर केली

नाथांची तळमळ जगाला दिसली

जनार्दनस्वामी गुरू त्यांना लाभले

एका जनार्दनी”,शिष्य हो शोभले ।।

 

भूतदया, प्राणीमात्रावर प्रेम करा

अज्ञान, अंधश्रद्धा साऱ्या दूर करा

भारुडे, गवळणी, गोंधळ, रचनेतून

जनजागृतीसाठी नाथांनी सांगितल्या ।।

 

नाथांची साहित्यसंपदा मोठी थोर

भावार्थ रामायण असे रसाळ गोड

तसेच लिहिले रुक्मिणी स्वयंवर

गवळणी, भारुडे, त्यांची घरोघर ।।

 

ज्ञानोबा माऊलींच्या सेवेसाठी

नाथमहाराज आळंदीस राहिले

समाधी जीर्णोद्धाराचे कार्य केले

संप्रदाय प्रसारकार्य व्यापक केले ।।

 

नाथांच्या चरणी नमन करितो

कवी अरुणदास काव्यपुष्प अर्पितो ।।

————————————————-

कविता- संत एकनाथांच्या चरणी

कवी- अरुण वि. देशपांडे-पुणे

9850177342

————————————————–

प्रतिक्रिया व्यक्त करा