You are currently viewing “सचैल न्हाला भादव”

“सचैल न्हाला भादव”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

“सचैल न्हाला भादव”

 

पिकून येता पिवळी शेते, प्रमुदित झाला भादव

भल्या पहाटे दंवात ओल्या, सचैल न्हाला भादव ॥धृ॥

 

तृप्त सुखाने डोलू लागली शेतांमधली भाते

काळ्या मातीसोबत त्यांचे घट्ट जाहले नाते

भ्रमरासंगे फुलाफुलांवर नाचत आला भादव

भल्या पहाटे दंवात ओल्या, सचैल न्हाला भादव ॥१॥

 

कपारितूनी निर्झर मारी आनंदाने ऊडी

डोंगर सारे हिरवे झाले, नद्या वाहती दुथडी

हस्तामधले कोसळणारे अमृत प्याला भादव

भल्या पहाटे दंवात ओल्या, सचैल न्हाला भादव ॥२॥

 

हिरव्या पिवळ्या रंगी नटली गुलमक्षीची जाळी

डाळिंबाची फुले लालसर,सोनकेवडा माळी

धरणी वरती अवतरली ही सुंदर बाला भादव

भल्या पहाटे दंवात ओल्या, सचैल न्हाला भादव ॥३॥

 

इंद्रधनूची कमान सुंदर गगनामध्ये खुलते

पकोळ्या अन चतुरासंगे कुठे पाखरू फिरते

स्वर्गसुखाने फुसांडणारा गोकुळ काला भादव

भल्या पहाटे दंवात ओल्या, सचैल न्हाला भादव ॥४॥

 

श्रीनिवास गडकरी

रोहा पुणे

9130861304

केवळ नावासहितच पुढे पाठवावे

@ सर्व हक्क सुरक्षित

 

 

*संवाद मिडिया*

 

*गुरुजनांसाठी हिरो ची खास ऑफर..*

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

 

💥 *शिक्षकदिन विशेष ऑफर* 💥

 

खास आपल्या गुरुजनांसाठी हिरो वाहन खरेदीवर खास सवलत 😇😇

 

HF DLX/SPLENDOR/PASSION सिरीझ वर रुपये 2000/-

 

SUPER SPLENDOR/GLAMOUR सिरीझ वर रुपये 2500/-

 

SCOOTER/PREMIUM सिरीझ वर रुपये 3000/-

 

दिनांक 20/09/2023 पर्यंत 🗓️

 

आजच बुक करा..📝

 

🎴मुलराज हिरो, एम.आय.डी.सी. कुडाळ

 

📱9289922336 / 7666212339

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा