You are currently viewing श्रावणमास

श्रावणमास

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच…लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्य लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*वनहरिणी वृत्त* (८-८-८-८)

*श्रावणमास*

श्रावण मासी माळावरती रानफुलांची गट्टी जमते
पहाटकाळी तृणपात्यांवर हिरे नि मोती शाळा भरते

हिरव्या हिरव्या तरू लतांनी वाऱ्यासंगे मैत्री केली
चंचल वारा पर्ण छेडुनी पळता पळता गळुनी गेली

श्रावणातला उन पाउस हा लपाछपीचा खेळ मनोहर
नभांगणीच्या इंद्रधनूची क्षितिजावरती कमान सुंदर

खडकांनाही फुटले पाझर झुळझुळ वाहे झरा निरंतर
शालू हिरवा लेउन सजली प्रिया नववधू शांत धरोहर

व्रतवैकल्य नि पूजा अर्चा सणासुदीचा महिना श्रावण
नागपंचमी रक्षाबंधन गोकुळाष्टमी सण मनभावन

©【दीपि】
दीपक पटेकर, सुंदरवाडी
८४४६७४३१९६

 

प्रतिक्रिया व्यक्त करा