You are currently viewing कधी कधी पण…

कधी कधी पण…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गझलकार श्री.अरविंदजी ढवळीकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*कधी कधी पण…*

चंद्र सूर्य बघ रोज उजळती प्रकाश विश्व् नवे
कधी कधी पण कभिन्न रात्री आठवती काजवे

सागर लाटांच्या मस्तीतच भान हरपुनी जावे
कधी कधी पण घरा मागचा ओढा मज आठवे

गिरीशिखरावर भव्य बुरुज तें नेत्रही दिपून जावे
कधी कधी पण वाळूतिल किल्यामागे मन धावे

इमारतींच्या उंचीने जेंव्हा मज खुजेपणा जाणवे
कधी कधी पण खेड्या मधले घर कौलारू हंसवे

आरास इथे रंगीत दिव्यांची नभ उजळुन दावे
कधी कधी पण समई पाहुन मन गाभारा व्हावे

धुंद इथे मी स्वैर धावतो नवी शहरे नवी गावे
कधी कधी पण सुन्न आठवतो आईची आंसवे

अरविंद

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 3 =