You are currently viewing शिवजयंती

शिवजयंती

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*शिवजयंती*

 

करती सारे वाढदिवस

शिवबांचा साजरा

स्फूर्तीगीते चौफुल्यांवरी

छत्रपतींना मानाचा मुजरा

 

गडकिल्ल्यांचा महाराष्ट्र हा

भगवा फडकविला

स्थापन करण्या स्वराज्य म्हणुनी

प्राणपणाने लढला

 

लाज वाटते का हो आता

मराठी म्हणावया

कोण चालला पुढे

त्याचे पाय खेचावया

 

महाराष्ट्राचे भूमीपुत्र तुम्ही

नसे तिळभर अभिमान

फिरंग्यांची भाषा तुम्हा

वाटे अती महान

 

कलह तुमचे खुर्चीसाठी

स्मरा हो शिवरायांना

सेवक बनुनी या मातीचे

रक्षावे प्रजाजनांना

 

मान वाढवा त्रैलोक्यातुनी

मराठी प्रांताचा

तेव्हा होईल जन्मदिवस

साजरा शिवाजीचा

 

*अरूणा मुल्हेरकर*

*मिशिगन*

*१९/०२/२०२४*

प्रतिक्रिया व्यक्त करा