You are currently viewing लावणी

लावणी

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमतीताई पवार लिखित अप्रतिम लावणी रचना*

*लावणी….*

का हो रूसलात सख्या सजणा ..
तुम्ही या ना जरा जवळी
हा पाहून रूसवा पहा ना झाले हो मी हळवी
या ना अहो या ना मी तुमचीच मोती पवळी ….

रूप राजस तुमचे गडे मला भुलवी
तुम्ही राया जणू चैत्राची पालवी
ऊन हळदीचे राया मला कसे भुलवी
नटखट मैना तुमची बघा राघूला झुलवी …

लाल किनखापी जाजम हो पहा कसा सजला
थाप ढोलकीवर राया बघा वळल्यात नजरा
थुईथुई नाचते मी तुम्हा साठी राया
फेटा उडतो तुमचा दरवळे अत्तराचा फाया …

बसा अलवार सख्या नजर ठेवा माझ्यावर
याद असू द्या हो हे तुमचं कुटूंब शेतावर
ज्वारीवानी सळसळे ज्वानी माझी बांधा बांधावर
राया काळजात बांधलंय् ना तुम्ही तुमचं घर …

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : २२ / ११ / २०२२
वेळ : रात्री १०/१७

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × two =