You are currently viewing @ # *त मा शा* # @

@ # *त मा शा* # @

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्मा.सदस्य लेखक कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

@ # *त मा शा* # @

रोज चालतो इथे *तमाशा*
चंद्रसूर्य आपले तोंड झाकतो
दिवट्यांचे फेडून कपडे रोज
दारा मागे *शील* उसवतो

तरूणाईचा येथे खेळ चालतो
*कुस्करून* टाकती कळ्या
रात्र *दिपवते* डोळे सर्वांचे
नसती येथे कुणी *सोवळ्या*

हिशोब असतो रोख ठोक तो
पाटी रोजची *कोरी* लागते
धनिकांची वणिकांची *येथे*
*वस्त्रे* पाहून *बोली* लागते

घड्याळे येथे *बंद* असती
तोंडेही असती सदा *मुकी*
सर्व *गणिते* येथे सुटती
विकून *टाकती* माणुसकी

रस्त्यावरचा *प्रकाश* पळतो
वेगा आधी *आवेग* वाढतो
मदिरेच्या *त्या* थेंबासरशी
कपडा अंगाला सोडून जातो

सूर *कोवळे* कुठे *हाळवे*
काळोखातून नाद *विव्हळे*
ठाऊक असते त्या अंधाराला
*बळजबरीचे* खेळ निराळे

मऊशार ते *हिरवे गालिचे*
जरी फेडती पारणे डोळ्यांचे
कृत्रिम दोरीने मान आवळती
घोट घेती ते मग *नरडीचे*

संग असंगाशी रोज चालतो
आरसाही फसतो कधीमधी
तोंड लपवती घालून बुरखा
तरूणी वाटली *जरी साधी*

तरूणाई ही *बहकु* लागली
हवा त्यांना *रात्रीचा दिवस*
खुळखुळणारा *पैसा* हंसतो
फेडतात कोणता रात्री नवस

येऊन *रस्ते* येथे “थबकती”
*मागे पडलं* *हिरवं रान*
*तमाशा* झाला आयुष्याचा
नाचतात सारे सोडून *भान*

विनायक जोशी🥳 ठाणे
मीलनध्वनी/९३२४३२४१५७
१९३/गुरूवार/२०एप्रिल २३

 

संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा